आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्बंध:दिल्लीत 25 पासून विना पीयूसीचे पेट्रोल-डिझेल मिळणे बंद

दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय राजधानीत वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर बंदी आणण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल पंपावर २५ ऑक्टोबरपासून पीयूसी प्रमाणपत्र असेल तरच पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. मंत्री गोपाल राय शनिवारी म्हणाले, यासंंबंधी लवकरच अधिसूचना काढणार आहे. राय म्हणाले, दिल्ली सरकार प्रदूषणापासून सुटका व्हावी यासाठी प्रभावी कृती आराखडा राबवण्यावर गंभीर आहे. त्यासाठी ३ ऑक्टोबरला चोवीस तास उपलब्ध असलेली वॉर रूम सुरू केली जाणार आहे.

मंत्री म्हणाले, ६ ऑक्टोबरपासून धूळविरोधी अभियान चालवले जाणार आहे. त्याअंतर्गत बांधकाम होत असलेल्या ठिकाणांची पाहणी केली जाणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार पावसामुळे राष्ट्रीय राजधानीचा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (एक्यूआय) सप्टेंबरमध्ये बहुतांश मध्यम श्रेणीत नोंदवला गेला. १०१ ते २०० दरम्यान एक्यूआय मध्यम स्वरूपात मानला जातो. सप्टेंबरच्या मासिक सरकारी २०२१ च्या तुलनेत त्यात २४ टक्के वाढ आहे.

बातम्या आणखी आहेत...