आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • No Treatment Given In Mini Hospital Started In Small House In Khajauli Village Of Bihar

हे आहे माणसांचे आरोग्य केंद्र:या ठिकाणी लावलेल्या फलकामुळे येथे उपचारही होतात हे कळते

खजौली (बिहार)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावातील पायाभूत आरोग्य सेवेची वस्तुस्थिती दर्शवणारे हे छायाचित्र बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील खजौली ब्लॉक मुख्यालयापासून चार किमीवरील सुक्की गावातील आहे. हे आरोग्य केंद्र ९० च्या दशकात सुरू झाले होते. आता त्याचे रूपांतर गोशाळेत झाले आहे.

किशोरी सिंह नावाच्या एका व्यक्तीच्या घरी सुरू असलेल्या या केंद्रात मंजुलाकुमारी नावाची एएनएमही ड्यूटीवर आहे. विशेष म्हणजे येथे उपचार होतात याचा पत्ताच ग्रामस्थांना नाही. संतोष शर्मा, रामाशिष पासवान, विष्णुदेव महरा, महेंद्र राम, सुशीलादेवी यांच्यासहित अनेक ग्रामस्थ सांगतात की, गावात अलीकडे ‘सर्दी-खोकल्याचा’ आजार फैलावत आहे. पण उपचार मिळत नाहीत. लोकांना दुसऱ्या गावांतील डॉक्टरांकडे जावे लागते.

बातम्या आणखी आहेत...