आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस मिळवण्याच्या धडपडीत लसीचा तुटवडा जाणवत अाहे. महाराष्ट्र, अांध्र प्रदेश अाणि अाेडिशानंतर अाता बिहार, उत्तर प्रदेशातही लसीचा तुटवडा हाेऊ लागला अाहे. या राज्यांत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. अनेक राज्यांत एक ते दाेन दिवसांचाच साठा शिल्लक अाहे. परंतु राज्यांना पाठवण्यात येणाऱ्या लसीमध्ये राजकारण हाेत असल्याचा अाराेप गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळून लावला अाहे. काेलकात्यामध्ये एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले, लसीची काेणतीही कमतरता नाही. सर्व राज्यांच्या गरजेनुसार लस उपलब्ध करून देण्यात अाली अाहे.
महाराष्ट्र : मुंबईत ३ खासगी केंद्रे बंद राहणार, फक्त सरकारीमध्ये लसीकरण
महाराष्ट्रात वीकेंड लाॅकडाऊन सुरू हाेण्याबराेबरच सरकारने तीन दिवसांसाठी खासगी लसीकरण केंद्रे बंद केली अाहेत. परंतु सरकारी केंद्रात लसीकरण सुरू राहील. मुंबईत शुक्रवारीही १२० पैकी ७५ लसीकरण केंद्रे बंद झाले. यामध्ये बहुतांश खासगी अाहेत. राज्याला दर अाठवड्याला ४० लाख डाेसची गरज अाहे. केंद्राने १७ लाख डाेस पाठवले असून ते पुरेसे नाहीत, असे अाराेग्यमंत्री राजेश टाेपे अाधीच म्हणाले अाहेत.
अाकडेवारी ८ एप्रिलपर्यंतची. आंध्र-बिहार-राजस्थान २, उत्तराखंड ३, ओडिशा ४, छग-हरियाणामध्ये ५ दिवसांचा साठा शिल्लक
उत्तर प्रदेश : खासगी केंद्रांवर कमी, जास्त मागणी असलेल्या केंद्रांवर पाठवलेे : गाझियाबादमध्ये अनेक लसीकरण केंद्रांवर शुक्रवारी लसीचा डाेस देता येऊ शकला नाही. या केंद्रांनी लस उपलब्ध नसल्याची तक्रार केली हाेती. लस घेण्यासाठी अालेल्या अनेकांना तसेच परतावे लागले. पूर्व उत्तर प्रदेशच्या अनेक सरकारी केंद्रांमध्येही लसीचा तुटवडा हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.