आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nobel Peace Prize 2021 | Maria Ressa And Dmitry Muratov Awarded The Nobel Peace Prize

शांततेचा नोबेल पुरस्कार:फिलिपिन्समधील मारिया रेसा आणि रशियातील दिमित्री मुरातोव यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर, दोन्हीही पत्रकार

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोबेल शांती पुरस्कार 2021 ची घोषणा झाली आहे. यंदाचा ‘शांततेचा नोबेल पुरस्कार’ हा फिलिपिन्स देशातील पत्रकार मारिया रेसा आणि रशियातील पत्रकार दिमित्री मुरातोव्ह यांना जाहीर झाला आहे. नोबेल प्राइजच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भातील अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र, शांतता किंवा बंधुत्व ठिकवून ठेण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

पुरस्कारांची घोषणा करताना नोबेल समितीचे अध्यक्ष बेरीट रीस-अँडरसन म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही लोकशाही आणि शाश्वत शांतीची पूर्व शर्त आहे. त्याचे संरक्षण करण्याच्या त्याच्या प्रयत्नांचा सन्मान करण्यात आला आहे.

या वर्षीच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा 4 ऑक्टोबर रोजी 'वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक' ने सुरू झाली. 5 ऑक्टोबर रोजी भौतिकशास्त्रातील नोबेल, 6 ऑक्टोबर रोजी रसायनशास्त्र आणि 7 ऑक्टोबर रोजी साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 11 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...