आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील कारने तरुणीचा मृतदेह फरफटत नेल्यासारखी घटना उत्तर प्रदेशच्या नोएडातही घडली आहे. ताजी घटना 1 जानेवारी रोजी रात्रीचा नोएडाच्या सेक्टर -ए फ्लाय ओव्हरजवळ घडली आहे. त्यात कारने डिलिव्हरी बॉय कौशल यादवला धडक दिली. त्यानंतर त्याला तब्बल 500 मीटरपर्यंत फरफटत नेले. चालकाने पुढे जाऊन कार थांबवली. पण मृतदेह तसाच सोडून घटनास्थळावरून पसार झाला. मूळचा इटाव्हाचा कौशल नोएडाच्या सलारपूरमध्ये राहत होता. तो नोएडा-दिल्लीमध्ये स्विगीकडून फूड डिलिव्हरी करत होता.
ओला कॅब ड्रायव्हरने दिली अपघाताची माहिती
कौशलचा भाऊ अमित कुमार यांनी या घटनेची तक्रार ठाणे फेज-1 ठाण्यात दाखल केली. या तक्रारीनुसार, 1 जानेवारी रोजी रात्री 1 च्या सुमारास अमित कुमारने आपला भाऊ कौशलला फोन केला. हा फोन एका अज्ञात व्यक्तीने उचलला व मी ओला कार चालवणारा व्यक्ती बोलत असल्याचे सांगितले. तो म्हणाला की तुझ्या भावाचा अपघात झाला आहे. एका अज्ञात वाहनाने त्याला सेक्टर-14 च्या फ्लाय ओव्हरजवळ धडक मारली. त्यानंतर त्याला शनी मंदिरापर्यंत फरफटत नेले. पोलिस आता या ओला कॅब चालकाचा शोध घेत आहे, ज्याने कौशलच्या भावाचा फोन उचलला होता.
दीड वर्षांपूर्वी झाले होते लग्न
भाऊ अमित कुमारने सांगितले की, त्यानंतर आम्ही शनी मंदिराजवळ पोहोचलो. तिथे कौशलचा मृतदेह पडलेला होता. घटनास्थळी पोलीसही होते. अमितच्या माहितीनुसार, त्याचा भाऊ मागील महिन्याभरापासून स्विगीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. कौशलचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते. शवविच्छेदनानंतर कुटुंबीय मृतदेह घेऊन इटाव्हाला गेले. तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील.
पोलिसांनी 25 CCTV फुटेज खंगाळले
मृतदेह फरफटत घेऊन आलेल्या शनी मंदिर परिसरात नोएडा प्राधिकरणाच्या गोशाला व शनी मंदिराबाहेर सीसीटीव्ही लावण्यात आलेत. गोशाळेचे सीसीटीव्ही फुटेत फार स्पष्ट नाही. मंदिराच्या संचालकांनी सांगितले की, 2 जानेवारी रोजी पोलिस आले होते. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले. पण धुके जास्त असल्यामुळे फार काही स्पष्ट दिसले नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यात शनी मंदिराजवळील स्पीड ब्रेकरजवळ एका कारमधून मृतदेह पडल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर पोलिसांचे वाहन तिथे येते.
पोलिसांचे 3 पथक तैनात
ADCP आशुतोष द्विवेदी यांनी सांगितले की, घटनेचा तपास सुरू आहे. या प्रकरणी दिल्ली व नोएडाच्या मुख्य रस्त्यांवरील CCTV फुटेजची पडताळणी केली जात आहे. विशेषतः ज्या ओला ड्रायव्हरने मृत व्यक्तीचा फोन उचलला होता, त्याचाही शोध घेतला जात आहे. यासाठी पोलिसांच्या 3 टीम्स तयार करण्यात आल्यात.
दिल्लीतही कारने एका तरुणीला फरफटत नेले होते. त्यासंबंधीच्या खालील बातम्या वाचा...
दिल्ली अपघातातील आणखी एक VIDEO:आरोपींची गाडी ज्या मार्गाने गेली, त्याच्या मागे होती पोलिस व्हॅन; पोलिस करणार पुन्हा तपासणी
दिल्लीतील कांझावाला अपघात प्रकरणातील आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये आरोपींची गाडी ज्या मार्गाने जात आहे, त्यामागे पोलिस व्हॅनही दिसून येत आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, 9 पोलिस कंट्रोल रूम (पीसीआर) व्हॅनने आरोपीच्या कारचा पाठलाग केला असे सांगितले जात होते पण त्यांना आरोपींची कार पकडण्यात यश आले नव्हते. अशातच ज्या ठिकाणाहून आरोपींची कार जाते. त्याच्या पाठीमागे पोलिसांची व्हॅन देखील जात असल्याचे व्हिडिओ सद्या व्हायरल झाला आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. येथे वाचा संपूर्ण बातमी...
कांझावाला केस; आरोपींच्या घरांना कुलूप:शेजारी म्हणाले- BJP नेता मित्तल सट्टेबाजी करायचा, अन्य चौघे सरळमार्गी
'आमचे पूर्वज लाहोरहून दिल्लीत आले होते. आमच्या वडिलांचे नशीब खराब होते म्हणून आम्ही मंगोलपुरीत येऊन स्थायिक झालो. नाहीतर आमच्यासारखे खन्ना दिल्लीतील पटेल नगर सारख्या छान भागात आणि मुंबईसारख्या शहरात राहतात. फुटक्या नशिबाने आम्हाला इथे आणले.'
दिल्लीच्या हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपी दीपक आणि अमित खन्ना यांची मावशी त्यांच्या दोन खोल्यांच्या छोट्या घरात मला हे सांगते. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.