आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीजवळील नोएडाच्या सेक्टर 63 मधील बहलोलपुर झोपडपट्टीत रविवारी दुपारच्या सुमारास सिलेंडर ब्लास्ट झाल्यामुळे भीषण आग लागली. वाऱ्यामुळे आणि तापमान गरम असल्यामुळे ही आग वेगाने परिसरात पसरली. अग्नीशमन दल घटना स्थळावर येईपर्यंत 500 झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या होत्या. यात घटनेत 2 आणि 6 वर्षांच्या दोन बहिणी जिवंत जळाल्या.
या आगीत जळून खाक झालेल्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. अद्याप संपूर्ण आग आटोक्यात आली नसून, आग विझविण्याचे काम सुरू आहे. बहलोलपुरमध्ये 20 एकर जमिनीवर अवैधरित्या तयार केलेल्या 1600 पेक्षा जास्त झोपडपट्ट्या आहेत. यात 6000 पेक्षा जास्त लोक राहतात.
लोकांच्या डोळ्यादेखत त्यांचा संसार उघड्यावर पडला
आग लागल्याची कळताच लोक आपले सामान वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. अनेकांच्या डोळ्यादेखत त्यांचा संसार जळून खाक झाला. महिला आणि मुलांचा आक्रोष परिसरात पसरला. लोकांमध्ये अग्नीशमन दलाच्या उशीरा येण्याने नाराजी आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.