आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • North India, Including Delhi, NCR, Was Shaken By The Strong Earth Quake; There Are No Reports Of Casualties

भूकंप:दिल्ली, एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला; जीवित-वित्तहानीचे वृत्त नाही

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 6.1 तीव्रतेच्या भूकंपाचे केंद्र होते ताजिकीस्तानात

दिल्ली, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) शुक्रवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. हे धक्के रात्री १०.३१ वाजता राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीरसह संपूर्ण उत्तर भारतात जाणवले. तथापि, त्यामुळे जीवित किंवा वित्तहानीचे वृत्त नाही. भूकंपाचे केंद्र ताजिकीस्तानमध्ये जमिनीखाली १० किमीवर होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.१ नोंदली गेली. पाकिस्तानसह इतर अनेक देशांतही भूकंपाचे धक्के बसले.

दिल्लीसहित विविध ठिकाणी भूकंपाच्या भीतीमुळे लोक घरांतून बाहेर पडले. अमृतसरमध्ये काही घरांना तडे गेल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, राजस्थानच्या बिकानेरमध्येही शुक्रवारी ४.३ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र बिकानेरपासून उत्तर-पश्चिमेकडे ४२० किमीवर होते. हा भूकंप भारतीय वेळेनुसार सकाळी ८.०१ वाजता आला होता.

भारत सुमारे ४७ मिलिमीटर प्रति वर्ष या गतीने आशिया खंडाला धडकत आहे. टेक्टॉनिक प्लेट्समधील या धडकेमुळेच भारतीय उपखंडात नेहमी भूकंप होत असतात. गुजरातच्या कच्छ भागात २००१ मध्ये आलेल्या अशाच भूकंपात हजारो लोक मारले गेले होते. तथापि, पाणीपातळीत घट झाल्याने टेक्टॉनिक प्लेट्सची गती काही काळापासून कमी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...