आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Not All State owned Banks Will Be Privatized, Says Finance Minister Nirmala Sitharaman

खासगीकरण:सर्वच नव्हे, मोजक्या सरकारी बँकांचेच होणार खासगीकरण, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे संकेत

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा मंगळवारी दुसरा दिवस होता.

देशातील सर्वच सरकारी बँकांचे खासगीकरण केले जाणार नाही. मात्र, ज्या बँकांची कामगिरी समाधानकारक नाही, अशा बँकांचे खासगीकरण केले जाणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी मंगळवारी स्पष्ट केले. हे पाऊल उचलले जात असताना त्या-त्या बँकांतील कर्मचाऱ्यांचे हित जोपासले जाईल, अशी हमीही त्यांनी दिली.

राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. याचा देशातील अनेक बँक व्यवहारांवर परिणाम जाणवला. केंद्र सरकार सर्वच सरकारी बँकांचे खासगीकरण करणार असल्याचा आरोप होत आहे. मात्र, यावर बाेलताना अर्थमंत्र्यांनी मोजक्या बँकांबाबत हा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगून काही बँकांचे खासगीकरण होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. सीतारमण यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी बँकांच्या खासगीकरणाबाबत घोषणा केली होती. त्यानंतर नऊ बँक कर्मचारी संघटनांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या सोमवारपासून पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी अर्थमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

संयुक्त पुरोगामी आघाडीने भ्रष्टाचाराचे राष्ट्रीयीकरण केले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी एक ट्वीट करून केंद्र सरकार नफ्याचे खासगीकरण आणि तोट्याचे राष्ट्रीयीकरण करत असल्याची टीका केली होती. यावर बोलताना सीतारमण म्हणाल्या, काँग्रेसप्रणीत यूपीएच्या काळातच करदात्यांचे खासगीकरण झाले आणि भ्रष्टाचाराचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...