आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काैशांबी, आझमगड सभांसाेबत 2024 ची तयारी:लोकशाही नव्हे तर काँग्रेसची घराणेशाही धोक्यात : अमित शहा

लखनऊ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी पूर्व उत्तर प्रदेशातील कौशांबी आणि आझमगडमध्ये सभा घेऊन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण तयार केले. २०२४ मध्ये मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प घेऊन आम्ही येथे आलो आहोत, असे गृहमंत्री म्हणाले. “एक बार फिर 300 पार मोदी की सरकार’ असा नारा देत ते म्हणाले की, लोकशाही नाही, काँग्रेस आणि विरोधकांची घराणेशाही धोक्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी आता उत्तर प्रदेशातील जातीवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरण संपवले आहे. २०२४ मध्ये फक्त उत्तर प्रदेशच देशाला मार्ग दाखवेल. आझमगडमध्ये शाह म्हणाले की, संपूर्ण देशात दहशतीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आझमगडमध्ये संगीत महाविद्यालय सुरू केले जात आहे.