आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Not Even A Month After The Inauguration That The Sea Plane Closed, Maldives Was Sent For Maintenance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सी-प्लेन सर्व्हिस एका महिन्यातच बंद:सी-प्लेन मेंटेनेंससाठी मालदीवला पाठवण्यात आले, 28 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा सर्व्हिस बंद; 50 वर्षे जुने आहे विमान

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वीही 2 वेळा रोखली सर्व्हिस , 50 वर्षे जुने आहे सी-प्लेन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद-केवडिया दरम्यान सी-प्लेन सर्व्हिसची सुरुवात 31 अक्टोबरला केली होती, पण एका महिन्यातच ही सर्व्हिस बंद झाली. सी-प्लेनला मेंटेनेंससाठी शनिवारी मालदीवला पाठवण्यात आले. ते परत कधी येईल याबद्दल अधिकारी सध्या गप्प आहेत. आम्ही सी प्लेन ऑपरेटर कंपनी स्पाइसजेटचे कम्युनिकेशन्स अधिकारी आनंद देव यांच्याशी बोललो आणि तेही म्हणाले, विमान मेंटेनेंससाठी पाठवण्यात आले आहे. यास काही दिवस लागू शकतात. यापूर्वी ही सेवा 2 वेळा बंद करण्यात आली होती.

यापूर्वीही 2 वेळा रोखली सर्व्हिस
31 अक्टोबरला उद्घाटनानंतर 1 नोव्हेंबरपासून जनतेसाठी सी-प्लेन सर्व्हिस सुरू करण्यात आली होती. या 28 दिवसांमध्ये सर्व्हिस यापूर्वीही दोन वेळा 3-3 दिवसांसाठी बंद करण्यात आली होती. त्यावेळी म्हटले होते की, क्रू मेंबरला आराम देण्यासाठी असे केले जात आहे.

50 वर्षे जुने आहे सी-प्लेन
सी-प्लेन सर्व्हिस देशात पहिल्यांदा सुरू झाली आहे, मात्र यात वापरले जाणारे प्लेन 50 वर्षे जुने आहे. मात्र हे ऑपरेट करणाऱ्या एअरलाइनचा दावा आहे की, प्लेन चांगल्या अवस्थेत आहे. स्पाइसजेटच्या प्रवक्तांनी सांगितले होते की, हे सी-प्लेन सर्वात सुरक्षित एअरक्राफ्टमधून एक आहे. याची रेग्युलर सर्व्हिस झाली आहे.

सी-प्लेनचे मेजरमेंट

सिटिंग कॅपेसिटी: 19 लोक वजन: 3377 किलो फ्यूल कॅपेसिटी: 1419 लीटर लांबी: 16 मीटर उंची: 6 मीटर फ्यूल पावर: 272 लीटर/तास वेट कॅपेसिटी: 5670 किलो

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser