आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:जपान नव्हे, हे तर मेघालय..

शिलाँग3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र मेघालयातील शिलाँगचे आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच शिलाँग व परिसरातील शहरे चेरीच्या गुलाबी फुलांनी मोहरून जातात. ही फुले बहरतानाच येथे दरवर्षी चेरी ब्लॉस फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. हा उत्सव शिलाँग येथील वर्ड‌्स लेक पार्कमध्ये होतो. त्यांचे मंगळवारी उद्घाटन झाले. काही कारणांमुळे उत्सवातील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मेघालयात चेरी ब्लॉसम पाहण्यासाठी देशोदेशीचे पर्यटकही भेट देतात. चेरीच्या गुलाबी फुलांचा मोहर हंगामाच्या अखेरपर्यंत राहतो. गुलाबी बहार सकारात्मक ऊर्जा देणारी असते, असे लोकांना वाटते.

बातम्या आणखी आहेत...