आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Not Only April, Travelers Also Avoid May June Bookings; Corona Fears Are Also Seen In Train Bookings

दिव्य मराठी विशेष:एप्रिलच नाही, मे-जूनच्या बुकिंगकडेही प्रवाशांची पाठ; ट्रेन बुकिंगमध्येही दिसतेय कोरोनाची भीती, प्रवास टाळण्याकडे लोकांचा कल

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दररोज केवळ 7 % तिकिटे बुक, सुटीतही लोकांना बाहेर पडायचे नाही

शरद पांडेय

लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वे सुरू होतीलही, मात्र प्रवासी प्रवासासाठीच तयार नाहीत. यामुळे अनेक रेल्वे गाड्यांमध्ये सर्वाधिक गर्दी असणाऱ्या  एप्रिलपासून ते मे, जूनपर्यंतच्या सीट्स रिकाम्या आहेत. रेल्वेनुसार, सध्या केवळ ७ टक्के तिकिटे बुक होत आहेत. पूर्वमध्ये केलेल्या बुकिंग रद्द होत आहेत. दरम्यान, रेल्वे सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे रेल्वेने गुरुवारी स्पष्ट केले आहे. २२ मार्चला जनता कर्फ्यूपासून ते १४ एप्रिलपर्यंत रेल्वेेसेवा बंद ठे‌वण्यात आली आहे. रेल्वेने १४ एप्रिलनंतर ऑनलाइन बुकिंग सुरू केली आहे. 

सोशल डिस्टन्सिंगमुळे विंडो रिझर्व्हेशन बंद आहे. सामान्यत: दररोज १४ लाख तिकिटे आरक्षित होतात. यापैकी ८.८५ लाख ऑनलाइन आणि ५.१५ लाख विंडोद्वारेे होतात. मात्र सध्या स्थिती याउलट आहे. कोरोनामुळे लोकांनी एप्रिलनंतर मे आणि जून म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवासाचा प्लॅन केलेला नाही. दररोज केवळ १ लाख ऑनलाइन रिझर्व्हेशन होत आहेत. दिल्ली ते बिहार जाणाऱ्या गाड्या वगळता भोपाळ, जयपूर, रांची, अहमदाबाद, लखनऊ, कालकामधील गाड्यांमध्ये जागा उपलब्ध आहेत. रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार कोरोनामुळे लोक प्रवासाला घाबरत आहेत. 

मजूर नाही, मालगाडी लोड-अनलोडसाठी तीन पटीने जास्त वेळ

नवी दिल्ली : दैनंदिन रोजावर काम करणारे मजूर गावी परतल्याने मालगाड्या लोड-अनलोड करणे ‌अवघड झाले आहे. आधीच्या तुलनेत तीन पटीने जास्त वेळ लागत आहेत. लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत रेल्वेने ६.७५ लाख वॅगन आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. दररोज ३५ हजार वॅगन पाठवले जात आहेत. यात धान्य, मीठ, साखर, खाद्यतेल, कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थ आहेत. एक मालगाडी लोड-अनलोड करण्यासाठी सुमारे २०० मजूर लागतात. जे ८ तासांत गाडी रिकामी करतात. मात्र सध्या २४ तास लागत आहेत. उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपककुमार सांगतात, लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दिवसांत खूप त्रास झाला. आता हळूहळू मजूर मिळत आहेत.

बातम्या आणखी आहेत...