आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Not Only BJP In Uttar Pradesh, Other Parties Also Demanded Lakhs Of Gamje masks Of Ramnama | Marathi News

रंग मारवाडी:उत्तर प्रदेशात भाजपच नाही, इतर पक्षांनीही मागवले रामनामाचे लाखो गमजे-मास्क

कन्नू भिलवारा/राकेश लिंबा | पाली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थानच्या पालीतून 2 कोटींची सामग्री यूपीला पाठवली

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. तिथे दिसणाऱ्या रंगीबेरंगी प्रचार साहित्यात रंग मारवाडी दिसतो आहे. येथील वस्त्रोद्योगातून ५० लाख मास्क, १० लाख टोप्या, २० लाख दुपट्ट्यापासून ३० लाख गमजे संबंधित पक्षांच्या आॅर्डरनुसार पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत २ कोटी रुपयांचे प्रचार साहित्य यूपीला पाठवले आहे. काँग्रेस वगळता सर्व पक्षांचे प्रचार साहित्य पालीत तयार होत आहे. १० हून अधिक वस्त्रोद्योगात २ महिन्यांपासून हे तयार होत आहे. उद्योजक विमल नाहटा यांनी सांगितले की, भाजप, सपा, बसप मास्क, टोपी, दुपट्ट्यापासून श्रीरामाचे गमजे, दुपट्टे तयार होत आहेत.

या वेळी गमजा-दुपट्ट्यावर भर
या वेळी जास्त भर उत्तर प्रदेशच्या पक्षांकडून गमजांवर दिला जात आहे. यामागचे मुख्य कारण यूपीच्या लोकांचे गमजावरील प्रेम आहे. बॅनर आणि झेंडे लवकर फाटतात आणि लोक ते सांभाळूनही ठेवू शकत नाहीत. मात्र, गमजा जोवर सामान्य व्यक्तीसोबत राहील तोवर तो पक्षासोबत जोडलेला असेल,अशी धारणा आहे.

भाजपचा प्रयत्न : कमळ असो की नसो भगवा रंग, रामनाम असावे
हिंदू व हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लढाईत राजकीय पंडितही निवडणूक रामनामावर टिकून राहण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. भाजपने रामनाम छापलेले भगवे गमजे व दुपट्टे मोठ्या संख्येत मागवले आहेत.भाजपकडून ही ऑर्डर उद्योजकांना मिळत आहे. मात्र, पक्षाचे नाव व चिन्ह कुठेही नाही.

उत्तर प्रदेशात आतापर्यंत पाठवलेले साहित्य
- 50 लाख मास्क पाठवले
- 10 लाख टाेप्या पाठवल्या
- 30 लाख रामनामाचे गमजे
- 20 लाख भाजप, सपचे दुपट्टे
- 10 लाख मास्क महिलांसाठी
- 20 लाख झेंडे पाडवले आहेत

बातम्या आणखी आहेत...