आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदुषणाच्या धोक्याचा इशारा:प्रदूषित हवेमुळे फुफ्फुस, हृदयाचेच विकार नव्हे तर गर्भपाताचाही धोका

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

िदल्ली, एनसीआरसह परिसरातील शहरांतील हवा अत्यंत वाईट श्रेणीत पोहोचली आहे. यामुळे केवळ श्वासाशी संबंधित आजार अणि फुफ्फुसांवर परिणाम नव्हे तर हार्ट आणि ब्रेन स्ट्रोकसह गर्भपाताचाही धोका वाढला आहे. दिल्ली एम्सचे माजी संचालक प्रो. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले, की सायन्स जर्नल ‌द लँसेट आणि देशातील अभ्यासातून समोर आले आहे, की वायूप्रदूषणाच्या अत्यंत वाईट श्रेणीत गर्भवतीने श्वास घेतल्यास त्याचा परिणाम भ्रूणावर होतो. भ्रूणाचा विकास खुंटतो. गर्भपाताचा धोका अधिक असतो. एम्सच्या संधिवातशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. उमा कुमार यांनी सांगितले, की प्रदूषण वाढल्याने गाऊट अर्थ्राइटिसच्या रुग्णांचा त्रास वाढतो. गाऊटची लक्षणे नसतात, त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांत अॉटो अँटीबॉडी पॉझिटिव्ह आढळले. अशांची संख्या १८% होती. त्यांची पुन्हा तपासणी केली जाईल. श्वासाशी संबंधित आजाराच्या रुग्णांची संख्या दररोज ७५ पेक्षा अधिक आहे.

विषारी झाली दिल्ली-एनसीआरची हवा, शाळा बंद करण्याची मागणी दिल्ली आणि एनसीआरमध्ये गुरुवारी धुके दाटल्याने काही ठिकाणी वायू गुणवत्ता सूचकांक (एक्यूआय) सकाळी ७ वाजता ४०८ वर पोहोचला, जो गंभीर श्रेणीत आहे. दिल्लीत सकाळी ८ वाजता तो ३६४ (अत्यंत वाईट) आणि ९ वजता ४२६ होता. दिल्लीच्या माॅडेल टाऊनमध्ये सर्वाधिक एक्यूआय ४५७ होता. उत्तर प्रदेशातील नोयडा आणि हरियाणातील गुरुग्रामची हवा विषारी झाली आहे. सकाळी उठल्यानंतर श्वास कोंडणे, डोळ्यांत जळजळीचा सामना सर्वांनाच करावा लागला. परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत शाळा बंद ठेवाव्यात अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. हवेचा दर्जा सुधारेपर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) दिल्ली सरकारकडे केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाचट नष्ट करणारे ़डिकम्पोजर घेण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकरी पाचट जाळत आहे, असे केंद्रीय पर्यवरणमंत्री भूपेंंद्र यादव यांनी सांगितले.

का वाढत आहे प्रदूषण? {हवेत आर्द्रता वाढल्याने त्याचा वेग कमी झाला. धुळीचे कण वाढले. {धुके दाटल्याने प्रदूषित कण आर्द्रतेमुळे वर जाऊ शकत नाहीत. {पंजाब, हरियाणात शेतांमध्ये पाचट जाळण्याच्या घटना अचानक वाढल्या. {बंदी असतानाही यंदा दिवाळीत जास्त फटाके फोडण्यात आले.

५३% लाेकांनी सांगितले, पाचट जाळण्याने प्रदूषण लाेकल सर्कलच्या सर्वेक्षणानुसार, पाचट जाळणे हे प्रदूषणाचे मुख्य कारण आहे, असे दिल्ली-एनसीआरच्या ५३ % लाेकांना वाटते. २० हजार जणांपैकी १० हजार ३७ जणांनी पाचट जाळणे मुख्य कारण वाटते. १३% लोकांना प्रदूषाणाला वाहने कारणीभूत वाटतात. ऑड-इव्हनला ५६% लोकांनी विराेध केला. तर ३८% लोकांनी समर्थन केले.

बातम्या आणखी आहेत...