आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Not Only Sanskrit, Tamil Is Also The Language Of God! Abhishek Should Be Done In Tamil Language: Madras High Court

चेन्नई:केवळ संस्कृत नव्हे, तामिळही देवभाषा! तामिळ भाषेतून अभिषेक व्हायला हवा : मद्रास हायकोर्ट

चेन्नई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळ ही देवभाषा आहे. देशभरात मंदिरांत अभिषेक अजवार, नयनमार या व्यतिरिक्त अरुणगिरीनाथर इत्यादी संतांनी रचलेल्या तामिळ भजनांच्या माध्यमातून व्हायला हवा. मद्रास उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीत हे स्पष्ट केले. न्यायमूर्ती एन. किरूबाकरन, न्यायमूर्ती बी. पुगालेंधी यांचे पीठ एका आदेशात म्हणाले, केवळ संस्कृतच ईश्वराची भाषा आहे, असे मानले जाते.

वास्तविक विविध देश, धर्म, विविध प्रकारच्या परंपरा अस्तित्वात हाेत्या आणि पूजेची पद्धतही संस्कृती व धर्मानुसार बदलत राहिली. परंतु केवळ संस्कृतच ईश्वराची भाषा आहे, असे मानले गेले. त्या समकक्ष काेणतीही भाषा नाही. संस्कृत प्राचीन भाषा आहे. त्यात अनेक प्राचीन साहित्याची रचना झाली आहे. त्याबाबत दुमत नाही. परंतु प्रार्थना केवळ संस्कृतमधील वेदांचे पठण केल्यानंतरच ईश्वर अनुयायांचे एेकताे, अशी धारणा बनली आहे.

करूर जिल्ह्यातील एका मंदिरात तिरुमुराईकल, तामिळ सैवा मंतरम, संत अमरावती अतरांगरई करुरर यांच्या तामिळ भजनांसह अभिषेक करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत काेर्टाने हे आदेश दिले.

सामान्य लाेक बाेलत असलेली प्रत्येक भाषा ईश्वरी भाषा आहे. माणूस भाषा बनवू शकत नाही. भाषा शतकांनुशतके सहअस्तित्वात आहेत. भाषा एका पिढीकडून दुसऱ्या िपढीकडे जाते. विद्यमान भाषेत केवळ सुधारणा हाेऊ शकते. भाषेचे निर्मिती हाेऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

शिवाचे डमरू पडून तामिळ भाषेचा जन्म
काेर्ट म्हणाले, तामिळ जगातील प्राचीन भाषा आहे. त्याचबराेबर ईश्वरीय भाषा आहे. तामिळ भाषेचा जन्म डमरूमधून झाला. भगवान शिव नृत्य करताना डमरू पडले हाेते. पाैराणिक कथेनुसार शिवाने पहिली अकादमीचे (प्रथम तामिळ संगम) अध्यक्षपद सांभाळले. तामिळ कवीच्या ज्ञानाच्या परीक्षणासाठी थिरुविलयादल हा खेळही खेळला. म्हणजेच तामिळ भाषा देवतांशी संबंधित आहे. पूजा-पठण करतेवेळी अशा ईश्वरीय भाषेचा वापर व्हायला हवा.

बातम्या आणखी आहेत...