आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Not Standing Up For The National Anthem Is An Insult; But Not The Crime, The Comment Of The Jammu And Kashmir High Court

श्रीनगर:राष्ट्रगीतासाठी उभे न राहणे अवमान; मात्र गुन्हा नव्हे, जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाची टिप्पणी

श्रीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रगीतासाठी उभे न राहणे त्याचा अवमान ठरू शकतो. ते राष्ट्रीय चिन्हांच्या अवमान रोखण्याच्या अधिनियमांतर्गत गुन्हा होऊ शकत नसल्याचे जम्मू आणि काश्मीर हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती संजीव कुमार यांच्या पीठाने महाविद्यालयाचे व्याख्याते डॉ. तौसिफ अहमद भटविरोधातील राष्ट्रगीताच्या अवमानप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करत ही टिप्पणी केली. न्यायालयाने सांगितले की, एखाद्या व्यक्तीने राष्ट्रगीत थांबवण्याचा किंवा सभेत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा होऊ शकतो. तेव्हा असे करणे संबंधित अधिनियमाच्या कलम ३ अंतर्गत दंडास पात्र आहे. यात तीन वर्षांपर्यंतची कैद वा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात.

काय होते हे प्रकरण?
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा जल्लोष करण्यासाठी गव्हर्नमेंट डिग्री कॉलेज, बानी (कठुआ जिल्हा) येथे २९ सप्टेंबर २०१८ रोजी एक समारंभ झाला होता. त्यात राष्ट्रगीतावेळी डॉ. भट उभे राहिले नव्हते. याआधारे त्यांच्यावर राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप झाला होता.

बातम्या आणखी आहेत...