आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Not The Pressure In The Exam Hall, Lack Of Revision Will Spoil The Result, If There Is Fear Of Mock Test, More Mistakes

दिव्य मराठी विशेष:परीक्षा हॉलमधील दबाव नव्हे, रिव्हिजन नसल्याने निकाल बिघडतो, मॉक टेस्टची भीती असेल तर अधिक चुका

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हातात प्रश्नपत्रिका, पर्यवेक्षकाची नजर, खोलीत भयाण शांतता आणि परीक्षार्थींचे चिंताजनक चेहरे. परीक्षा हाॅलमधील या वातावरणामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होतो, असे मानले जाते. या चिंतेमुळे अनेक वेळा विस्मरण होते. परंतु मानसशास्त्राच्या सखोल अभ्यासामुळे हा समज खोटा ठरला आहे. ज्या मुलांनी परीक्षेपूर्वी उत्तम तयारी केली आहे, रिव्हिजन चांगली केली आहे, त्यांच्या निकालावर परीक्षा हॉलमधील चिंतायुक्त वातावरणाचा परिणाम होत नाही, असे आता सिद्ध झाले अाहे.

सायकोलॉजिकल सायन्समध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार जे परीक्षार्थी मुख्य परीक्षेपूर्वी मॉक टेस्ट देण्यास कचरतात त्यांचा निकाल अधिकच बिघडतो. हा अभ्यास करणाऱ्या लेबनीज इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड इन्फर्मेशनच्या मारिया थियोबोल्ड म्हणतात, वास्तविक परीक्षा हॉलमधील वातावरणामुळे आठवत नाही असे होत असेल तर मग ज्या मुलांनी आधीच परीक्षेबद्दल काळजी वाटते म्हणूून सांगितले त्यांना पेपर खराब जायला पाहिजे. परंतु तसे होत नाही. ज्या मुलांनी मॉक टेस्टमध्ये सतत उत्तम कामगिरी केली पण परीक्षा हॉलमध्ये त्यांना दडपण वाटत होते त्यांचे निकाल उत्तम लागले, असे प्रयोगात सिद्ध झाले. थियोबोल्ड यांनी जर्मनीच्या ३०९ मेडिकल विद्यार्थ्यांचे अंतिम परीक्षेपूर्वी १०० दिवस आधी ऑनलाइन परफॉर्मन्स नोंदवून ठेवले. ४० दिवस आधी त्यांची पहिली मॉक टेस्ट घेतली.

प्रत्येक दिवशी त्यांच्या एन्झायटी लेव्हलचीही नोंद ठेवली. त्यानंतर अंतिम परीक्षेच्या तीन दिवस आधी टेस्ट घेतली. ज्या परीक्षार्थींनी प्री टेस्टमध्ये चांगले गुण मिळवले होते त्यांना चिंता वाटत असली तरीही अंतिम परीक्षेत उत्तम गुण मिळाले. थियोबोल्ड यांनी रिव्हिजनच्या दबावाबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या, एखादा विषय आणि अभ्यास उत्तम असेल तर त्यांच्यावर रिव्हिजनचा दबाव कमी असतो. रिव्हिजन प्रेशर ही चिंतेची बाब नसून परीक्षेपूर्वी दोन दिवस अगोदर येणाऱ्या दबावाचे अाहे. अधिक दडपण घेतल्यास मेंदूची ग्रहण क्षमता कमी होते. त्यामुळे खूप मेहनत केली तरीही बऱ्याच गोष्टी आठवत नाहीत. पास होण्याचे दडपण घेतल्यास क्षमता घटते.

आत्मविश्वास अन् ठाम निश्चय...हे सर्व परीक्षांपेक्षा मोठे आहे या तणावातून बाहेर पडण्याचे दोन मार्ग थियोबोल्ड यांनी सांगितले. पहिला परीक्षार्थींनी स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. स्वत:ला समजवा हे मला माहिती आहे,नसेल तर माहिती करुन घेईन. आत्मविश्वास हा या दबाबातून बाहेर काढेल. दुसरे महत्वाचे म्हणजे परीक्षा महत्वाची आहे परंतु आयुष्यातील ही काही अखेरची परीक्षा नाही असे स्वत:ला समजावणे. स्वत:बद्दल खात्री बाळगणे अन् ठाम निश्चय यापेक्षा मोठे काहीच नाही, असे थियोबोल्ड म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...