आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:हेल्मेट न घालणे मृत्यूचे कारण असले तरी अपघाताचे नाही : उच्च न्यायालय

कोच्ची9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भरपाई कमी करण्याचा लवादाचा आदेश केला रद्द

हेल्मेट न घातल्याने अपघातप्रकरणी भरपाई कमी करण्याचा लवादाचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला होता. त्याने हेल्मेट घातले नसल्याने लवादाने भरपाईची रक्कम कमी केली होती. मृताच्या कुटुंबीयांनी या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान दिले हाेते.

उच्च न्यायालयाने सांगितले की, अपघातात मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट न घातल्याने कायद्याचे उल्लंघन केले असले तरी त्याने निष्काळजीपणा केला असे म्हटले जाऊ शकत नाही. अपघातात ‘निष्काळजीपणा’ प्रत्येक प्रकरणात तथ्य आणि परिस्थितीच्या दृष्टीने ठरवला जातो. त्याने हेल्मेट घातले असते तर त्याचा जीव वाचला असता. जीव जाईल एवढी गंभीर जखम झाली नसती. हेल्मेट न घालण्यास आपण बाइकला धडक देण्याचे कारण म्हणू शकत नाहीत, असे न्यायालयाने सांगितले.

न्यायालयाने सांगितले की, जो अपघात झाला त्यात निष्काळजीपणा वाटा होता, हे ठरवण्याची गरज आहे. मात्र, न्यायालयाने इशारा दिला की, त्यांच्या या आदेशाला हेल्मेट न घालता गाडी चालवण्याचा परवाना समजू नये. ही घटना ८ ऑगस्ट २००७ ची आहे. मोहंमदकुट्टी वैद्याक्करन मुलासोबत बाइकवर जात होते. समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या बाइकला धडक दिली. अपघातात दोघे जखमी झाले. वैद्याक्करन यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांना ३३ लाख ३७९९ रुपयांची भरपाई मंजूर झाली. मात्र ट्रिब्यूनलने वैद्याक्करन यांनी हेल्मेट घातले नसल्याने अपघातात त्यांचा निष्काळजीपणाला जबाबदार धरत भरपाईतून २० टक्के रक्कम कमी केली होती.

बातम्या आणखी आहेत...