आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस, चार आठवड्यात मागितले उत्तर

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रूरल लिटिगेशन अँड एटाइटलमेंट सेंटर (आरएलएसी) यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने मागच्या वर्षी माजी मुख्यमंत्र्यांकडे घर व इतर सुविधांबाबतची थकबाकी मागितली होती.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. आदेश दिल्यानंतरही सुविधांची थकबाकी न दिल्याबद्दल उत्तराखंड उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कारणे नोटीस बजावण्यात आली. तसेच चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

उत्तराखंड हाय कोर्टाने माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे त्याच्याविरोधात अवमान केल्याची नोटीस बजावली आहे. त्यांना चार आठवड्यात उत्तर मागितले आहे.

रूरल लिटिगेशन अँड एटाइटलमेंट सेंटर (आरएलएसी) यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने मागच्या वर्षी माजी मुख्यमंत्र्यांकडे घर व इतर सुविधांबाबतची थकबाकी मागितली होती. तसेच ही थकबाकी सहा महिन्यांच्या आत जमा करण्याचे आदेश दिले होते. सहा महिन्यानंतरही थकबाकी भरली नसल्याने आरएलएसीकडून हायकोर्टामध्ये अवमान याचिका दाखल करण्यात आली. याचिकेवर सुनावणी करताना या आदेशाचे पालन का केले नाही आणि या माजी मुख्यमंत्र्यांविरूद्ध अवमान कारवाई का केली जाऊ नये, असा सवाल कोर्टाकडून सरकारला विचारण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...