आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Notification To Add Aadhaar To Voter List, Now Registration Of Young Voters Four Times In A Year

नवी दिल्ली:मतदार यादीशी आधार जोडण्यासाठी अधिसूचना, आता वर्षभरात चार वेळा तरुण मतदारांची नोंदणी

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधार क्रमांक मतदार यादीला जोडण्यासाठी सरकारने अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे मतदार यादीत एका व्यक्तीचे वेगवेगळ्या ठिकाणी नाव नोंदले जाण्याची समस्या संपेल.

केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, केंद्र सरकारने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की, आता दरवर्षी १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबरला १८ वर्षे पूर्ण झालेले तरुण मतदार नोंदणीसाठी अर्ज करू शकतील. याआधी एक जानेवारी हीच कटऑफ तारीख होती. या बदलामुळे विविध निवडणुकांत तरुण मतदार सहभागी होऊ शकतील. सरकारने निवडणूक कायद्यातील काही तरतुदींतही बदल केला आहे. एका तरतुदीत ‘पत्नी’ ऐवजी ‘जीवनसाथी’ असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व्हिस व्होटरचा पती किंवा पत्नी मतदान सुविधेचा फायदा घेऊ शकतील. दुर्गम भागांत तैनात जवान किंवा विदेशात भारतीय मिशनचे सदस्य सर्व्हिस व्होटर आहेत.

बातम्या आणखी आहेत...