आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन हजाराच्या नोटा जमा करणे किंवा बदलण्याचे काम २३ मेपासून सुरू होईल. नोट बदलण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) रविवारी काही गोष्टी स्पष्ट केल्या. देशभरातील एसबीआयच्या कोणत्याही शाखेत विना आेळखपत्र, पत्त्याचा पुराव्याशिवाय २ हजार रुपयांच्या १० नोटा बदलता येतील. त्यासाठी बँकेत स्लिप भरण्याचीही गरज नाही. बँक हे काम ३० सप्टेंबरपर्यंत करेल.एसबीआयच्या पहिल्या सूचनेत एक फॉर्मेट संलग्न करून तो शाखेत नोट बदलताना दाखल करण्यास सांगितले होते. तेव्हा नोट बदलण्यासाठी आलेल्या व्यक्तीला हस्ताक्षरातील अर्जासोबत आेळखपत्रही सादर करण्याची सूचना होती. मात्र आता बँकेने सर्व शाखांना नवीन निर्देश दिले. त्यानुसार कोणताही व्यक्ती स्वत:च्या खात्यावर दोन हजाराच्या किताही नोटा जमा करू शकतो. परंतु त्यासाठी त्याने रिझर्व्ह बँक व आयकर विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. परंतु शाखेत २ हजाराच्या १० नोटा बदलण्यासाठी काहीही मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली नाहीत.
२ हजाराच्या नोटांनी सोन्याची खरेदी : दिल्ली, मुंबई, सुरत, जयपूरसारख्या शहरांत २ हजार रुपयांच्या नोटेने सोने खरेदीसाठी गर्दी झाली आहे. सुरतचे सीए मेहल शहा म्हणाले, अनेक लोक आठ-दहा हजार देऊन सोने घेऊन जात आहेत. अहमदाबादमध्ये काही ज्वेलर्सने २ हजार नोटेवर बाजारभावात सोन्याच्या विक्रीचे फलक लावले. मुंबई, नोएडा, दिल्लीतून नोटेने सोने खरेदी करणाऱ्यांकडून जास्त पैसे घेत असल्याचे माहिती आहे.
कोणताही चार्ज नाही
मला २ हजाराच्या १० नोटा बदलण्यासाठी काय करावे ?
शाखेच्या कॅश काउंटरमध्ये २ हजाराची नोट द्यावी लागेल. कॅशियर नोटेच्या बदल्यात तेवढ्याच किमतीच्या दुसऱ्या नोटा देईल. एका वेळी कमाल २० हजार रुपये मूल्यांच्या नोटा बदलता येतील. नोट बदलण्यासाठी काहीही चार्ज लागणार नाही.
बँकेत अर्ज देण्याची गरज आहे?
मुळीच नाही. एसबीआयने आधीच फॉर्मेट रद्द केला आहे. आता आयडी किंवा इतर अर्ज भरण्याची गरज नसल्याचेही एसबीआयने स्पष्ट केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.