आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Now 6 Airbags Are Mandatory For Passenger Vehicles, According To Union Minister Nitin Gadkari, Latest News And Update News, Facility Will Be In Cars Produced From October 1, 2022.

वाहनांना 6 एअरबॅग अनिवार्यचा निर्णय वर्षभर लांबणीवर:केंद्रीय मंत्री गडकरींची माहिती; 1 ऑक्टोबर 2023 पासून होणार अंमलबजावणी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 8 सीटापर्यंत असलेल्या M1 श्रेणीतील कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने एका वर्षाने पुढे ढकलला आहे.
 • हा निर्णय 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार होता, परंतु आता 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होईल.
 • ते म्हणाले की, ऑटो उद्योग सध्या जागतिक पुरवठा साखळीशी संबंधित समस्यांना तोंड देत आहे, हे लक्षात घेऊन ते पुढे ढकलण्यात आले आहे.

वाहने अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वतीने नवीन नियम लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. नितीन गडकरी म्हाणाले की, प्रवासी कारमध्ये (M-1 श्रेणी) किमान 6 एअरबॅग अनिवार्य असणार आहे. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 2023 पासून केली जाईल. अशी घोषणा मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

8 प्रवाशांच्या गाडीत किमान 6 एअरबॅग

8 प्रवासी बसू शकतील अशा प्रवाशी वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग देणे बंधनकारक असणार आहे. हा नियम ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार होता. परंतू या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी ऑक्टोबर 2023 पासून केली जाणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) आपल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत केंद्रीय मोटर वाहन नियम (CMVR) 1989 मध्ये सुधारणा करून सुरक्षा वैशिष्ट्ये वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नितीन गडकरी यांचे ट्विट एएनआय यांनी रिट्विट केले आहे.
नितीन गडकरी यांचे ट्विट एएनआय यांनी रिट्विट केले आहे.

हे महत्त्वाचे निर्णय जरूर वाचा

 • 14 जानेवारी 2022 रोजी जारी करण्यात आलेल्या मसुद्याच्या अधिसूचनेनुसार, M1 वर्गाच्या वाहनांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • 5-8 सीट असलेल्या कारचा या श्रेणीत समावेश आहे.
 • मंत्रालयाच्या नव्या निर्णयानुसार आता गाड्यांमध्ये 6 एअरबॅग आवश्यक असणार आहेत.
 • 1 ऑक्टोबर 2023 पासून हा निर्णय प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे.
 • दोन बाजूचे पडदे/ट्यूब एअरबॅग आणि आउटबोर्ड सीटिंग पोझिशनसाठी प्रत्येकी एक एअरबॅग प्रदान केली जाणार आहे.

अपघातातील मृत्यूचा आकडा चिंता वाढवणारा

भारतात दरवर्षी दीड लाखाहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. यामध्ये वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे अपघात होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. 2020 मध्ये वेगाने प्रवास करणाऱ्या वाहनांच्या अपघातांमध्ये 91 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झालेला होता. याशिवाय सीट बेल्ट न लावलेल्या वीस हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. सातत्याने होणाऱ्या रस्ते अपघातांमधील मृत्यू पाहता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे रोखण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवीन मंत्रालयाने सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये एअरबॅग्स अनिवार्य करण्याचा आदेश जारी केला आहे.

टाटाचे माजी अध्यक्ष मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर एअरबॅग्स चर्चेला उधाण

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा 4 सप्टेंबर 2022 रोजी पालघर येथे रस्ते अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून रस्ते सुरक्षेच्या प्रश्नावर देशभर चर्चा होऊ लागली. लोकांचा रस्ते प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी 8 सीटर वाहनांमध्ये 6 एअरबॅग्स देणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला जावा, अशी मागणी देखील होऊ लागली.

नव्या निर्णयामुळे ही आव्हाने समोर येण्याची शक्यता

 • कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य केल्यास सेफ्टी रेटिंग सुधारेल पण कारच्या किमती वाढू शकतात.
 • एंट्री-लेव्हल कारमध्ये फ्रंट एअरबॅगची किंमत 5-10 हजार रुपयांपर्यंत जाते.
 • जर साईड आणि कर्टन एरबॅग दिल्या तर कारची किंमत पुन्हा वाढणार आहे.
 • जर 6 एअरबॅग अनिवार्य असतील तर कार खरेदी करण्यासाठी साधारण 50 हजार रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहे.
 • अतिरिक्त एअरबॅग प्रदान करणे ही आणखी एक समस्या आहे. जी कारच्या री-इंजिनिअरिंगशी संबंधित असू शकते.
 • कारण त्या ठिकाणी असलेल्या कार सुरक्षिततेच्या या स्तरावर डिझाइन केलेल्या नाहीत.
 • एकदा सहा एअरबॅग्ज आवश्यक झाल्यानंतर त्यांचे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी कारचा आतील
 • बदलावा लागेल. त्यामुळे खर्च वाढणार आहे.

एअरबॅगच्या सद्यस्थितीबद्दल जाणून घेऊया...

 • मारुती सुझुकी, रेनॉल्ट आणि निसानच्या कोणत्याही कारमध्ये दोनपेक्षा जास्त एअरबॅग नाहीत.
 • ज्या कार कंपन्या त्यांच्या वाहनांमध्ये सहा एअरबॅग देत आहेत, त्यापैकी बहुतांश मॉडेल्स आणि व्हेरियंटची किंमत 10 लाखांपेक्षा जास्त आहे.
 • गतवर्षी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, लहान मोटारी, ज्या बहुधा निम्न मध्यमवर्गीय लोक खरेदी करतात, त्यांनाही पुरेशा एअरबॅग्ज पुरवल्या पाहिजेत.
 • ऑटो कंपन्या मोठ्या कारमध्ये फक्त आठ एअरबॅग देत आहेत. ज्या कार फक्त श्रीमंत लोकच खरेदी करतात. बाकीच्या कारला देखील ही सुविधा असणे गरजेचे आहे.
बातम्या आणखी आहेत...