आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांसाठी १८२ जागांवर पॅनल नावे तयार केली आहेत. पॅनलमध्ये प्रस्तावित नावाबाबत योग्य मंथन व्हावे असा त्यामागील उद्देश आहे. भाजप सूत्रानुसार गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय झाला. शहा यांनी या प्रक्रियेदरम्यान तीन वेळा पक्षाने केलेली पाहणी, त्याचे निष्कर्ष व याबाबत संघटनेच्या नेत्यांची मत जाणून पॅनलला (प्रती जागा दावेदारांची नावे, अपवाद वगळात एकापेक्षा जास्त) आकार दिला आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यातील बैठक व दिल्लीत संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर त्यावर अंतिम निर्णय होईल. राज्यभरात विधानसभा जागांसाठी अनेकांनी दावेदारी केली आहे. म्हणूनच वरील चार टप्प्यात पडताळणी केल्यानंतर भाजपने दावेदारांच्या दाव्यांचे परीक्षण केले. त्यानंतर त्यास पॅनलमध्ये स्थान देण्यात आले. उमेदवार निश्चित करणाऱ्या प्रदेश शाखेच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत अंतिम टप्प्यात शहा व हर्ष संघवी यांना समाविष्ट करण्यात आले.
चार टप्प्यांतील सतर्कता उमेदवार निवडीसाठी चार स्तरीय चाळणी तयार करण्यात आली आहे. काही जागांवर तीन ते चार जणांचे दावे आहेत. त्यात बहुतांश महानगरांतील जागांचा समावेश आहे. भाजप पाहणीतील निष्कर्षांना उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान देते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.