आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Now A Unique Health Card Like Aadhaar; It Will Have Your Complete Medical Record

सुख वार्ता:आता आधारसारखे युनिक हेल्थ कार्ड; त्यात आपले संपूर्ण मेडिकल रेकॉर्ड असेल, देशाच्या कोणत्याही रुग्णालयात गेलात तरी मागील सर्व रिपोर्ट‌्स तेथेच मिळतील

नवी दिल्ली / पवनकुमारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कार्डमध्ये डॉक्टर, आरोग्यसेवा कर्मचारी, लॅब, केमिस्ट यांच्या माहितीची नोंद असेल

केंद्र सरकारने युनिक हेल्थ आयडी कार्ड बनवण्याची तयारी पूर्ण केली आहे. या कार्डमध्ये आरोग्याशी संंबंधित सर्व माहितीची नोंद असेल. तुम्हाला दुसऱ्या राज्यात किंवा शहरात जायचे असले तरी आपले मेडिकल रिपोर्ट््स सोबत नेण्याची गरज राहणार नाही. कारण तुमची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री हेल्थ कार्डमध्ये नोंदलेली असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन (एनडीएचएम) लाँच करू शकतात. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनमध्ये डॉक्टर, रुग्णालये, लॅब आणि केमिस्टचीही माहिती नोंदलेली असेल. त्याचा पथदर्शी प्रकल्प गेल्या वर्षीच अंदमान-निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, दमण-दीव, लडाख आणि लक्षद्वीपमध्ये सुरू झाला होता. या राज्यांत युनिक कार्ड बनवण्यास सुरुवात झाली आहे. आता ही योजना देशभरात सुरू केली जाईल.

डॉक्टरांना ओटीपी सांगितल्यानंतरच ते कार्डमध्ये नोंदलेली माहिती पाहू शकतील
हेल्थ कार्ड कसे तयार होईल ?

योजनेची घोषणा होताच गुगल प्ले स्टोअरवर एनडीएचएम हेल्थ रेकॉर्ड (पीएचआर अॅप्लिकेशन) उपलब्ध होईल. त्याद्वारे नोंदणी होईल. युनिक आयडी १४ डिजिटचा असेल.

ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, ते हेल्थ कार्ड कसे आणि कुठे तयार करू शकतील?
नोंदणीकृत सरकारी-खासगी रुग्णालये, कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वेलनेस सेंटर, कॉमन सर्व्हिस सेंटर येथे कार्ड तयार होतील. तेथे सामान्य माहिती विचारली जाईल. उदा. नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर इत्यादी.

युनिक हेल्थ कार्डचा फायदा काय?
कार्डमध्ये आपल्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती डिजिटल फॉरमॅटमध्ये नोंदली जात राहील. संपूर्ण मेडिकल हिस्ट्री अपडेट होईल. त्यामुळे आपण एखाद्या रुग्णालयात उपचारासाठी गेलो तर आपले जुने सर्व रेकॉर्ड तेथेच डिजिटल फॉरमॅटमध्ये मिळेल. एवढेच नव्हे, तर आपण दुसऱ्या शहरातील रुग्णालयातही गेलो तरी तेथेही युनिक कार्डद्वारे डेटा पाहता येऊ शकेल. त्यामुळे डॉक्टरांना सहजपणे उपचार करता येतील. तसेच अनेक नवे रिपोर्ट्््स किंवा प्राथमिक तपासण्या यात लागणारा वेळ आणि खर्च वाचेल.

कार्डमध्ये माहिती कशी नोंदली जाईल?
कार्ड तयार झाल्यानंतर मागील सर्व रिपोर्ट्््स आपल्याला स्वत: स्कॅन करून अपलोड करावे लागतील. पण पुढील सर्व रिपोर्ट््स आपोआप अपलोड होत राहतील.
उदाहरणार्थ-एखाद्या डिस्पेन्सरी किंवा रुग्णालयात आपली तपासणी होईल तेव्हा आपल्या युनिक आयडी कार्डमध्ये नोंदलेल्या १४ डिजिटच्या युनिक नंबरमार्फत हे रिपोर्ट््स कार्डशी लिंक होतील. रुग्णालयात एनडीएचएम कर्मचारी आपल्याला मदत करण्यास उपस्थित असतील.

कार्डमध्ये कोणकोणती माहिती असेल?
आपल्या मेडिकल रेकॉर्डशी संबंधित प्रत्येक माहिती त्यात नोंदली जाईल. उदा. गेल्या वेळच्या कोणत्या औषधांचा आपल्यावर परिणाम झाला की नाही? औषध बदलले तर ते का? त्यामुळे उपचार करताना डॉक्टरांना केस समजू शकेल.

दुसऱ्या शहरात डेटा कसा मिळेल?
डेटा रुग्णालयात नव्हे, तर डेटा सेंटरमध्ये असेल, तो कार्डद्वारे पाहता येईल. म्हणजे आपण कुठे उपचार करून घेण्यास गेलो तर ते आपल्यासाठी आधार कार्डसारखे महत्त्वाचे असेल.

हेल्थ डेटा कोणीही पाहू शकेल का?
नाही. कारण, आपण कार्डचा ओटीपी नंबर सांगू तेव्हाच त्यात नोंदलेला डेटा पाहता येऊ शकेल. कार्डचा १४ डिजिटचा नंबर नोंदणीकृत रुग्णालयाच्या संगणकात नोंदला गेल्यानंतरच ओटीपी नंबर जनरेट होईल. त्यानंतर जेव्हा ओटीपी नंबर भरला जाईल तेव्हा डेटा स्क्रीनवर दिसेल. पण तो कॉपी करता येणार नाही तसेच ट्रान्सफरही करता येणार नाही. त्यानंतर जेव्हा दुसऱ्या रुग्णाचा डेटा शोधला जाईल तेव्हा पहिल्या रुग्णाचा डेटा लॉक होईल. तो पुन्हा पाहण्यासाठी पुन्हा ओटीपी लागेल.

मग डेटा ट्रान्सफर होऊच शकत नाही का?
होऊ शकतो, पण तुम्ही सहमती दिल्यानंतरच. जेव्हा कोणाला तुमचा डेटा ट्रान्सफर करण्याची इच्छा असेल किंवा पाहण्याची इच्छा असेल तेव्हा तुमच्याकडून ओटीपी मागेल. तुम्ही मंजुरी दिली नाही तर डेटा दिसणार नाही.

हेल्थ कार्ड तयार करणे अनिवार्य असेल?
ते अनिवार्य नसेल. कार्ड तयार करायचे आहे की नाही हे आपल्या इच्छेवर अवलंबून असेल.

- आर. एस. शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण

बातम्या आणखी आहेत...