आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात काेराेनाबद्दलच्या बेपर्वाईत वाढ झाल्याने जाेखीमही वाढलीये. मंगळवारी १६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत सक्रिय रुग्ण वाढले. महाराष्ट्रासह पंजाब, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेशसारख्या राज्यांतील नवे रुग्ण वाढत चालले आहेत. नवे रुग्ण असलेल्या राज्यांची यादी आता लांबत चालली आहे. मंगळवारी एकूण नवीन रुग्ण संख्या कमी हाेऊन १२,२७६ अशी झाली एवढा मात्र दिलासा राहिला. एक आठवड्यानंतर नवे रुग्ण १५ हजारांहून कमी झाले. जवळपास निम्मे रुग्ण अजूनही महाराष्ट्रात आहेत. मंगळवारी गेल्या चाेवीस तासांत ९१ जणांचा मृत्यू झाला. ही संख्याही आदल्या दिवशीच्या तुलनेत कमी झाली. एकूण ८६ टक्के मृत्यू केवळ ६ राज्यांत झाले आहेत. मंगळवारी देशात सक्रिय रुग्णांची संख्या १,६८, ३३१ झाली होती.
पंजाब व तामिळनाडूत केंद्राने केली टीम तैनात
देशात वाढत्या रुग्णसंख्येबाबत आराेग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, केंद्राची संपूर्ण घडामाेडींवर निगराणी आहे. तामिळनाडू व पंजाबमध्ये केंद्राने पथके तैनात केली आहेत. हरियाणात निगराणी केली जात आहे. देशातील २२ राज्यांतील १४० जिल्ह्यांत काेराेनाचा आलेख वर आहे. १० दिवसांपूर्वी म्हणजे २२ जानेवारीपर्यंत अशा प्रकारचे १२२ जिल्हे हाेते. त्यापैकी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याशिवाय केरळ-९, तामिळनाडू-७, पंजाब व गुजरातच्या प्रत्येकी ६ जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या जिल्ह्यांत दाेन महिन्यांच्या तुलनेत काेराेनाची रुग्णसंख्या दरराेज वाढत चालली आहे.
- 54 विद्यार्थी हरियाणाच्या कर्नालमध्ये एका शाळेच्या वसतिगृहात कोरोनाबाधित झाले. वसतिगृहाला उपचार केंद्र करण्यात आले आहे. - 156 बौद्ध भिक्खू हिमाचल प्रदेशात धर्मशाळाजवळील ग्यूतो विद्यापीठात कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ही संख्या सोमवारी १०० होती.
ब्राझील : लाेक पुन्हा झाले बाधित, नव्या कोरोनाचा मोठा संसर्ग
ब्राझीलमध्ये काेराेनाच्या नव्या प्रकारामुळे लाेक बाधित हाेण्याचे प्रमाण वाढले. आधी बरे झालेल्यांचाही त्यात समावेश आहे. हा प्रकार बी. १.१.७ व दक्षिण आॅफ्रिकेतील बी.१.३५१ या पेक्षा वेगळा आहे. संशाेधकांनी त्याचे नाव पी. १ ठेवले आहे. संशाेधकांनी गेल्या डिसेंबरमध्ये त्याचा शाेध लावला हाेता. तीन वेगवेगळ्या संशाेधनांनुसार ब्राझीलमधील मनास शहर उद्ध्वस्त हाेण्यामागे पी.१ या विषाणूच्या प्रकाराची भूमिका राहिली आहे. ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या चिनी लसीलादेखील पी.१ निष्क्रिय करून टाकू शकते. पी.१ विषाणू ब्राझीलसह आणखी २४ देशांत पसरला आहे. अमेरिकेतील पाच राज्यांत त्यांचा संसर्ग झाला आहे.
इशारा : अमेरिकेत चाैथी लाट शक्य, नवे रुग्ण वाढू शकतात
अमेरिकेच्या सेंटर्स फाॅर डिसीज कन्ट्राेल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) देशात चाैथी लाट येईल, असा इशारा दिला आहे. या चाैथ्या लाटेमुळे नवीन रुग्णांची संख्या वाढू शकते. सीडीसी हेड डाॅ. वेलेन्स्की म्हणाले, काेराेनाबद्दलच्या नव्या विश्लेषणानुसार आम्हाला तशा प्रकारचा इशारा मिळाला आहे. अमेरिकेत लाॅकडाऊनमध्ये सवलत दिली. ते म्हणाले, सध्या जास्त सवलत देणे धाेकादायक ठरू शकते. अमेरिकेत दरराेज ५० हजारांहून जास्त रुग्ण आढळत आहेत. वेलेन्स्की म्हणाले, गेल्या आठवड्यात एका दिवसात ७० हजार नवे रुग्ण आढळून आले हाेते. ब्रिटनमधील बी १.१.७ व्हेरिएंट अमेरिकेत सर्वाधिक संसर्ग करणारा ठरेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.