आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीफ ऑफ डिफेंस स्टाफपदी (CDS) हवाई दलात कार्यरत किंवा सेवानिवृत्त झालेल्या एअर मार्शल व एअर चीफ मार्शलला संधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्राने हवाई दलाच्या नियमावलीत योग्य ती सुधारणा केली आहे.
सरकारच्या गॅझेट अधिसूचनेनुसार, यापुढे हवाई दलात कार्यरत किंवा सेवानिवृत्त झालेल्या एअर मार्शल-एअर चीफ मार्शललाही सीडीएस होता येईल. पण, यासाठी त्यांचे वय 62 हून अधिक असू नये. याऊलट सीडीएसचा कार्यकाळ वयाच्या 65 वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो. संरक्षण मंत्रालयाने सोमवारी हवाई दल कायदा 1950 च्या सेक्शन 190 अंतर्गत येणाऱ्या एअरफोर्स रेग्युलेशन 1964 मध्ये सुधारणा केली आहे. त्यानंतर लगेचच त्याची गॅझेट अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.
यापुढे त्याला एअरफोर्स (दुरुस्ती) रेग्युलेशन 2022 नावाने ओळखले जाईल. 1964 च्या नियमावलीतील 213 (अ) तरदूत रद्दबातल करुन त्यात 213 (अ-ब) संलग्नित करण्यात आले आहे.
CDS पद 5 महिन्यांपासून रिक्त
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेंस जनरल बीपिन रावत यांचा 8 डिसेंबर रोजी एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. सरकारकडून वारंवार या पदाची भरती प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते. पण, त्यावर पुढे काहीच होत नाही. रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्न मधुलिका व अन्य लष्करी अधिकारीही मारले गेले होते. हे सर्वजण कोइम्बतूरच्या सुलूर हवाई तळावरुन वेलिंग्टनला जात होते. पण, मध्येच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.