आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आता थेट भाजपनेच पत्र पाठवले आहे. दिल्लीतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी भाजपच्या आंदोलनाला मदत करा अशी हाक दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदर्श गुप्ता यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि भ्रष्टाचारविरुद्ध आवाज उठवणारे अण्णा हजारे यांना दिली आहे. गुप्ता यांनी पत्र पाठवत अण्णा हजारेंकडे ही मागणी केली आहे.
आदर्श गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे की आम आदमी पार्टी भ्रष्टाचारामध्ये सामिल आहे. तुम्ही दिल्लीत या आणि येथील लोकांना हे सांगा. त्यांनी पत्रात लिहिले की, तुमच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाने भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता. मात्र आज हाच पत्र भ्रष्टाचार करताना दिसत आहे.
काही जणांनी बनावट कंपनी तयार करून आपला दोन कोटींची देणगी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता त्यांना अटक केली आहे. याच काळातआदर्श गुप्ता यांचे हे पत्र अण्णा हजारेंना आले आहे. गुप्ता यांनी पत्रात लिहिले की, 'आम्हाला आठवते की 5 एप्रिल 2011 रोजी तुम्ही दिल्लीच्या रामलीला मैदानावर भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणि जनलोकपाल विधेयकाची मागणी करुन तत्कालीन सरकारविरूद्ध आमरण उपोषण सुरू केले होते. तुमच्या या आंदोलनामध्ये दिल्लीतील आणि देशभरातील कोट्यावधी लोक सामिल झाले होते. मात्र या आंदोलनानंतर तुमच्याच नावाने काही लोकांनी स्वच्छ राजकीय व्यवस्थेची बाजू मांगली आणि निवडणुकीत उतरले. आता अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून आम आदमी पक्षाची राजकीय पक्ष म्हणून स्थापन केली आहे. ते मुख्यमंत्रीही आहेत.
या पत्रात कुणाकुणाचे नाव?
आदेश गुप्ता यांनी अण्णा हजारेंना लिहिलेल्या पत्रामध्ये अनेकांच्या नावाचा समावेश आहे. त्यांनी या पत्रामध्ये लिहिले की, दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाले. यानंतर प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, प्राध्यापक आनंद कुमार, कुमार विश्वास यांचे खरे चेहरे लोकांसमोर आले आहेत. सोमनाथ भारती असो की संदीप कुमार, अमानतुल्ला खान किंवा जितेंद्र तोमर या नावांची यादी लांबलचक आहे. खोटी आश्वासने, खोटे हेतू आणि जातीय राजकारणाच्या आधारे पुन्हा सत्तेत आल्यानंतर दिल्लीतील लोकांना आपने केलेल्या जातीय दंगलींचा सामना करावा लागत आहे. आता अण्णा तुम्ही पुन्हा दिल्लीमध्ये यावे आणि भ्रष्टाचारविरोधात आवाज उठवावा आणि भाजपला पाठिंबा द्यावा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.