आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगवान मार्ग:आता मालगाड्याही ताशी 99 किमी वेगाने ‘सुपरफास्ट’ धावू लागल्या

सुनीलसिंह बघेल (थेट वेस्टर्न कॉरिडॉररहून)13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या स्थानकावरून राजधानी एक्स्प्रेस व मालगाडी एकाच वेळी जाते. परंतु नियाेजित प्रवासाचे ठिकाण आधी मालगाडीने गाठले तर? िवश्वास बसत नाही. परंतु हे वास्तवात पाहायला मिळाले. १५० वर्षांची परंपरा असलेल्या भारतीय रेल्वेगाड्यांमध्ये मालगाड्यांनी केवळ ताशी २४ किलाेमीटर वेग गाठला असेल. परंतु आता वेगाचा चमत्कार प्रत्यक्षात दिसून येत आहे. सुपरफास्ट राजधानीचा वेग ताशी ७५ किमी आहे. मात्र मालगाड्या आता ताशी ९९ किमीचे अंतर सहज गाठू शकतात. सुपरफास्ट ट्रेन एखाद्या स्थानकासाठी १० ते १२ तासांचा वेळ घेते. तेथे मालगाडीला पाेहाेचण्यासाठी ९ ते १० तास लागतात. हा इतिहास लिहिला जात आहे. त्यासाठी ९५ हजार काेटी रुपये खर्चून ३२०० किमीचा ईस्टर्न व वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) साकारण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ७५ हजार काेटी रुपये खर्च झाले आहेत. २१ हजार काेटी रुपये तर भूसंपादनावर खर्च झाले आहेत.

देशातील सर्वात शक्तिशाली १२ हजार अश्वशक्तीचे राफेल
पश्चिमेकडील काॅरिडाॅरवर जयपूरजवळ न्यू फुलेरा स्थानकापासून दिल्लीकडे जाताना काही वेळातच वेग ताशी ९० झाला. लाेकाेपायलट म्हणाले, बघा, आमचे राफेल किती शक्तिशाली आहे...दाेन डबल डेकर मालगाड्या म्हणजेच रेल्वेच्या चार मालगाड्यांची बराेबरी करेल एवढा माल घेऊन गाडी भन्नाट वेगाने धावत आहे. ‘राफेल’ तर आम्ही दिलेले टाेपणनाव आहे. याची बनावट देशी आहे. १२ हजार अश्वशक्तीचे देशातील सर्वात शक्तिशाली इंजिन आहे. अॅनाकाेंडालादेखील सहज आेढेल. अॅनाकाेंडा? म्हणजे? मी चकित झाल्याचे पाहून आॅपरेशन इन्चार्ज सतवीरसिंह म्हणाले, आम्ही कधी-कधी दाेन-तीन मालगाड्या साेबत जाेडून चालवताे. त्यालाच आम्ही कधी वासुकी किंवा शेषनाग किंवा अॅनाकाेंडा म्हणताे. गप्पा एवढ्या रंगल्या की अडीच तास उलटल्याचे कळलेही नाही. आम्ही अटेली गाठले हाेते. डीएफसीवर आम्ही इंजिनातून सुमारे ४५० किलाेमीटरचा प्रवास ५.३० ते ६ तासांत पूर्ण केला. सामान्य रेल्वे ट्रॅकवरून त्यासाठी १० ते १५ तास लागले असते.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे जुन्या रुळाच्या समांतर नवा रूळ. त्यावरून केवळ मालगाड्या धावतील. डीएफसीच्या १ हजार किमी मार्गावर मालवाहतूक सुरूदेखील झाली आहे.

वेस्टर्न कॉरिडॉरमध्ये १५०० किमीपर्यंत क्राॅसिंग नाही
दिल्ली-मुंबईला जाेडणाऱ्या वेस्टर्न काॅरिडाॅरच्या १५०० किमी भागावर १४८ लेव्हल क्राॅसिंग रद्द करण्यात आले. रस्ते वाहतुकीसाठी उड्डाणपूल तयार केले. २८५ लहान-माेठे पूल, चार रेल्वे उड्डाणपूल, २०० बाेगदे व उड्डाणपूल तयार झाले आहेत. -रवींद्र जैन, एमडी

बातम्या आणखी आहेत...