आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना व्हायरस:आता देशात तयार झालेल्या व्हेंटिलेटरची होईल निर्यात

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • निर्यातीसाठी कोविड-19 संबंधित गठित मंत्रिमंडळाच्या गटाची मान्यता

देशात कोरोना संसर्गामुळे गंभीर व्यक्तींच्या संख्येतील कमी पाहता स्वदेशी बनावटीच्या व्हेंटिलेटरच्या निर्यातीसाठी कोविड-१९ संबंधित गठित मंत्रिमंडळाच्या गटाने मान्यता दिली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले, मंत्रालयाने या संदर्भात कॅबिनेटसमोर प्रस्ताव ठेवला होता. यास मान्यता देण्यात आली आहे.

या निर्णयाबाबत विदेश व्यापार महासंचालकांना (डीजीएफटी) माहिती देण्यात आली आहे. स्वदेशी बनावटीच्या व्हेंटिलेटरची निर्यात सुनिश्चित करण्यासाठी आता डीजीएफटी आवश्यक ती पावले उचलेल. देशात कोरोना मृत्युदरात सातत्याने घट होत आहे.

देशातील कोरोना मृत्यू सध्या २.१५ टक्के आहे. मंत्रालयानुसार, ३१ जुलैपर्यंत एकूण सक्रिय रुग्णांपैकी केवळ ०.२२ टक्के कोरोनाबाधित व्हेंटिलेटरवर होते. व्हेंटिलेटर उत्पादन वेगात वेगाने होत आहे. देशभरातील २० हून अधिक कंपन्या व्हेंटिलेटर बनवत आहेत.

२४ ला व्हेंटिलेटरच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. देशातील कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळावेत हा यामागील हेतू होता. देशात कोरोना विरोधात लढाई सुरू असून त्यावर नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...