आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिनी सोलार:आता चीनहून सौर उपकरणाच्या आयातीवर कर लावण्याची तयारी, एक दिवस आधी काही पाेलाद उत्पादनांच्या आयातीवर लावली होती

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनसह तीन देशांतील काही पोलाद उत्पादनांवर अँटी डम्पिंग ड्यूटी लावल्यानंतर भारत चीनच्या काही सौर उपकरणाच्या आयातीवर १ ऑगस्टपासून सीमाशुल्क लावण्याची तयारी करत आहे. देशाला या प्रकरणात स्वावलंबी करण्यासाठी अक्षय्य ऊर्जा मंत्रालयाने या संदर्भात प्रस्ताव तयार केला आहे. सध्या भारत, चीन आणि मलेशियाकडून सोलार सेल आणि मॉड्यूलच्या आयातीवर १५% सेफगार्ड ड्यूटी वसूल करत आहे. याचा अवधी जुलै अखेरीस संपत आहे. मंत्रालयाचा उद्देश सोलार सेल, मॉड्यूल व इन्व्हर्टरच्या आयातीवर शुल्क लावण्याचा आहे. अक्षय्य ऊर्जामंत्री राजकुमार सिंह यांनी या संदर्भात सांगितले की, उद्योग जगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विचार-विनिमय झाला आहे. हा निर्णय अशा वेळी घेतला जात आहे, जेव्हा भारत-चीनमध्ये सीमावाद उफाळला आहे. सोलार मॉड्यूलच्या देशात होणारा पुरवठ्यात सुमारे ८०% ची हिस्सेदारी आहे. केंद्र सरकारने एक दिवस आधी मंंगळवारी चीन, व्हिएतनाम व कोरियातील काही पोलाद उत्पादनांवर पाच वर्षांसाठी अँटी डम्पिंग शुल्क लावण्याची घोषणा केली.

बातम्या आणखी आहेत...