आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुन्हेगारांवर अंकुश आणि त्यांची तत्काळ धरपकड करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने नॅशनल ऑटोमेटेड फिंगर-प्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टिमच्या (नफिस) साह्याने संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. फिंगर प्रिंट रेकॉर्डसह गुन्हेगार व त्यांच्या नातेवाइकांचे मोबाइल क्रमांकालादेखील संलग्न करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. म्हणजे फिंगर प्रिंट दस्तएेवजामध्ये असलेल्या नोंदीशी गुन्हेगारी घटनेच्या ठिकाणी आढळलेले ठसे जुळल्यास ३ मिनिटांत गुन्हेगार मोबाइल क्रमांक लोकेशनला ट्रेस केला जाऊ शकतो.
नफिस प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत १ काेटी ५ लाख ८० हजार २६६ नोंदींच्या विश्लेषणाचे काम सुरू आहे. देशभरात गुन्हेगारांच्या फिंगर प्रिंटचा डेटा गृह मंत्रालयाने एकत्र करून त्याचा संगणकीकृत डेटा तयार केला आहे. आतापर्यंत असलेल्या डेटामधील एखादा ठसा नव्या गुन्ह्याच्या ठिकाणी आढळल्यास त्यास संशयित म्हणून नोंदवले जाते.
3 मिनिटांत फिंगर प्रिंट डेटाद्वारे व्यक्तीचा तपशील संगणकाच्या स्क्रीनवर येतो. यातून संशयिताचा संपूर्ण तपशील मिळतो. परंतु त्याची सध्याचे लोकेशन स्पष्ट होत नाही. हीच अडचण दूर करण्यासाठी संशयितांचे (फिंगर प्रिंटचा डेटामध्ये असलेले) मोबाइल क्रमांक व त्यांच्या नातेवाइकांचे क्रमांकही जोडले जातात. हे काम पूर्ण झाल्यानंतर संशयितांचे बोटांचे ठसे एखाद्या घटनेतील ठशांसोबत जुळतात का हे पडताळले जाईल. यावरून संशयिताचे लोकेशनही समजेल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला. परंतु या व्यवस्थेसाठी सीआरपीसी, आयपीसीमध्ये काही दुरुस्तीचीही गरज आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.