आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Omar Abdullah House Arrest: Omar Abdullah Claims He And His Family Put Under House Arrest By Authorities Latest News And Updates On Kashmir Omar Abdullla

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरात राजकीय हालचाली:मला आणि माझे वडील फारूख अब्दुल्ला यांना नजरकैद केले; ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावरून दिली माहिती

श्रीनगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महबूबा मुफ्ती यांनीही केला होता नजरकैद आरोप

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी सांगितले की, त्यांचे वडील फारून यांनी अधिकाऱ्यांनी नजरकैद केले आहे. याआधी पीडीपी अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी आपल्याला नजरकैद केल्याचा शनिवारी दावा केला होता.

ओमर म्हणाले - - ऑगस्ट 2019 नंतर हे नवीन काश्मीर आहे

ओमर यांनी शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी लिहिले की, "ऑग्सट 2019 नंतर हे नवीन काश्मीर आहे. आम्हाला कोणत्याही कारणास्तव आमच्या घरात बंद केले आहे. त्यांनी मला व माझ्या वडिलांना आमच्या घरात बंदिस्त केले हे पुरेसे नव्हते काय? आता त्यांनी माझी बहीण आणि त्यांच्या मुलांना देखील बंदिस्त केले आहे."

ओमर अब्दुल्ला यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करून स्वतःला नजरकैद केल्याचा दावा केला आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करून स्वतःला नजरकैद केल्याचा दावा केला आहे.

ते म्हणाले की, आम्हाला कोणत्याही कारणाशिवाय नजरकैद करणे हे तुमच्या लोकशाहीचे नवीन मॉडले आहे. मात्र घरात काम करणाऱ्या स्टाफला देखील घरात येऊ दिले जात नाही. आता जेव्हा मी रागावतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते.

महबूबा मुफ्ती यांनीही केला होता आरोप

याआधी राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी एक व्हिडिो जारी करत त्यांना नजरकैद केल्याचा आरोप केला होता. त्या म्हणाल्या की, बनावट चकमकीत मारल्या गेलेल्या अथर मुश्ताकच्या कुटूंबाला भेटण्याचा प्रयत्न करताना त्यांनी नेहमीप्रमाणे नजरकैद केले आहे. सरकारचे काही लोक माझ्या घरी आणि त्यांनी बाहेर जाण्यास मज्जाव केला. मी त्यांना कारम विचारले असता ते गप्प बसले होते.