आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या आठवड्यात चीनने अरुणाचल प्रदेशात ११ ठिकाणांची नावे बदलली हाेती. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साेमवारी दाेन दिवसीय राज्य दाैऱ्यावर आले आहेत. चीन तिबेटच्या दक्षिणेकडील भागाला जंगनान असे संबाेधते. त्यात शहा यांच्या हस्ते सीमा भागातील किबिथू येथे व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कुणीही भारताच्या एक इंच भूमीवरही अतिक्रमण करू शकत नाही, भारताचे पायदळ व भारत-तिबेट सीमा पोलिस) यांच्या पराक्रमामुळे हे स्पष्ट झाले, असे शहा म्हणालेे.
याप्रसंगी शहा यांनी ईशान्येत केलेल्या विकासाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, सीमा भागाला मोदी सरकारचे प्राधान्य आहे. कोणीही आमच्या भूमीवर कब्जा करत होते असा काळ आता राहिलेला नाही. आता सुईएवढ्या जमिनीवरही अतिक्रमण करता येणार नाही. १९६२ युद्धातील किबिथू येथील शहिदांना शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पुरेशा साधनांचा अभाव असूनही हे वीर दुर्दम्य साहसाने लढले. अरूणाचलमध्ये कोणीही नमस्ते म्हणत नाही. कारण लोक ‘जय हिंद’ असे म्हणत अभिवादन करतात. ही गोष्ट आपले मन देशभक्तीच्या भावनेने आेतप्रोत करणारी ठरते. पूर्वी सीमा भागातून परतलेले लोक भारतातील शेवटच्या गावात गेलो होतो, असे सांगत. परंतु आता भारताच्या पहिल्या गावाला भेटून आल्याचे लोक सांगतात, असे शहा म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.