आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमद पटेल यांच्या कन्या:आता राजकारणात उतरण्याची तयारी; मुमताज यांची भूमिका

भरुच10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सक्रिय राजकारणात उतरून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा माझा विचार आहे. परंतु त्यासाठी आधी गुजरातच्या जनतेने मला स्वीकारले पाहिजे, असे काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या कन्या मुमताज पटेल यांनी बुधवारी म्हटले आहे.वडिलांचा राजकीय वारस म्हणून माझ्याकडे पाहू नका. परंतु मला चांगले काम करण्यासाठी एखादी संधी मिळणार असल्यास मी निश्चितपणे राजकारण सक्रिय होईन, असे मुमताज म्हणाल्या. बुधवारी भरुच शहरात आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. निवडणुकीचे तिकीट दिल्यास तुम्ही काय निर्णय घ्याल, या प्रश्नावर मुमताज यांनी ही भूमिका मांडली.अहमद पटेल गुजरातमधील राज्यसभेचे सदस्य होते. नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांना कोविडची बाधा झाली होती. यापूर्वी काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनीदेखील सक्रिय राजकारण प्रवेशाची आणि संधी मिळाल्यास निवडणूक लढवण्याचीही इच्छा व्यक्त केली होती.

बातम्या आणखी आहेत...