आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीवर डाेळा ठेवून भाजप नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व दस्तएेवज (एनआरसी) यांचा वापर करत असल्याचा आराेप तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये सीएए, एनआरसी मुळीच लागू करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
निवडणुकीचे वारे वाहू लागताच भाजप सीएए व एनआरसीचे मुद्दे बाहेर काढते. या वर्षाच्या अखेरीस गुजरात निवडणूक आहे. त्यानंतर लाेकसभा आहे. तेव्हाही सीएएचा मुद्दा काढला जाईल. मग काेण नागरिक आहे किंवा नाही हे भाजप ठरवणार का, असा प्रश्नही ममतांनी उपस्थित केला. त्या बुधवारी कृष्णनगर येथे पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत हाेत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.