आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअज्ञात ‘बाबा’च्या इशाऱ्यावर काम करत असल्याच्या आरोपास तोंड देणाऱ्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने चित्रा यांच्या व्यतिरिक्त अन्य माजी सीईओ रवी नारायण व माजी समूह ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांच्या विरोधात लूकआऊट जारी केली आहे. देश सोडण्यास त्यांना मज्जाव करण्यासाठी ही नोटीस देण्यात आली. सीबीआयने शुक्रवारी चित्रा यांची चौकशीही केली.
को-लोकेशन प्रकरणात सुरू असलेल्या तपासातील तथ्यांनुसार ही चौकशी झाली. सीबीआयने दिल्लीची कंपनी ओपीजी सेक्युरिटीजचे प्रवर्तक संजय गुप्ता व इतरांच्या विरोधात एनएसईच्या को-लोकेशन सुविधेचा कथित दुरुपयोगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआय सेबी व एनएसईच्या अज्ञात अधिकारी व इतरांच्या विरोधात चौकशी केली जात आहे. कंपनीचे मालक व प्रवर्तकांनी एनएसईच्या अज्ञात अधिकाऱ्यांच्या संगनमताने एक्स्चेंज सर्व्हरचा दुरुपयोग केला असा आरोप आहे. त्याद्वारे त्यांनी एनआसईमध्ये बेकायदा पोहोच निर्माण केली. वर्ष २०१०-२०१२ दरम्यान मिळालेल्या को-लोकेशन सुविधेने कंपनीला एनएसईच्या सर्व्हरमध्ये पोहोच साध्य करण्यासाठी इतर ब्रोकरच्या तुलनेत त्यांना सक्षमता आली होती.
त्यामुळे कंपनीला काही सेकंद आधी मार्केटमधील डेटा मिळत होता. सेबीने अलीकडेच एक दावा केला होता. एनएसईच्या चित्रांनी अज्ञात बाबाच्या प्रभावाखाली अनेक मोठे निर्णय घेतले. आनंद सुब्रमण्यम यांच्याकडे समूह संचलन अधिकारी तसेच व्यवस्थापकीय सल्लागार पदाची जबाबदारी सोपवली गेली. सेबीने ११ फेब्रुवारी रोजी चित्रा व रवी नारायणसह इतरांना सुब्रमण्यम यांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत केलेल्या उल्लंघनाबद्दल दंड दिला आहे. चित्रा यांना ३ कोटी रुपये, रवी नारायण व सुब्रमण्यम यांना प्रत्येकी २ कोटी तर व्ही.आर. नरसिम्हण यांना सहा लाख रुपयांचा दंड लावला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.