आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्रास हायकोर्टात याचिका:एनटीएने माझी ओएमआर शीट बदलली; विद्यार्थिनीचा आराेप

चेन्नईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नीट यूजीच्या एका विद्यार्थिनीने नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर (एनटीए) ओएमआर बदलल्याचा आराेप केला आहे. परीक्षेच्या वेळी भरलेली ओएमआर शीट वेगळी हाेती. त्यात विविध २०० प्रश्न हाेते. पैकी १८० प्रश्न साेडवणे अपेक्षित हाेते. त्यापैकी १६७ प्रश्नांची उत्तरे दिली हाेती. १३ प्रश्न साेडले हाेते. परंतु तिला देण्यात आलेली प्रश्नपत्रिका भलतीच हाेती. त्यात विद्यार्थिनीने ६० प्रश्न साेडवले नव्हते, असे दिसत हाेते. विद्यार्थिनीने ३१ ऑगस्ट राेजी एनटीएला एक मेल पाठवला हाेता. परंतु त्याचे उत्तर मिळाले नव्हते. त्यामुळे मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. अंगठ्याचे निशाण पडताळल्यास माझा आराेप सिद्ध हाेईल, असा दावा विद्यार्थिनीने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...