आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील तपोवनमध्ये झालेल्या दुर्घठनेच्या सहा दिवसानंतरही बचावकार्य सुरुच आहे. मीडिया रिपोर्टमध्ये आयटीबीपीच्या आधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, सात मीटर खोदकाम केल्यानंतर मोठा दगड लागल्यामुळे बोगद्यात जाण्यासाठी गुरुवरी सुरू करण्यात आलेली ड्रिलिंग थांबवली आहे. बचाव पथकाने आता या आधीच्या योजनेनुसार, ढिगारा हटवून आत जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
2 मृतदेह सापडले, अजून 168 जणांचा शोध सुरू
चमोलीच्या जिल्हाधिकारी स्वाती भदौरिया यांनी सांगितले की, आतापर्यंत 36 जणांचे मृतदेह सापडले असून, दोन जण जिवंत सापडले आहेत. अजूनही 168 जणांचा शोध सुरू आहे. यातील 39 कर्मचारी बोगद्यात अडकल्याची शक्यता आहे. NDRF चे कमांडेंट पीके तिवारी यांनी सांगितले की, नदीच्या किनाऱ्यालगत मृतदेहांचा शोध सुरू आहे.
उद्या चिनूक हेलिकॉप्टरमधून मशीनरीपाठवली जाईल
गुरुवारी सैन्याच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून रेस्क्यूसाठी मोठ्या प्रमाणात मशीनरी आणि मॅन पावर चमोलीकडे पाठवली जाईल. NDRF आणि SDRF साठी 14 पॅसेंजर्स आणि 1400 किलो लोड, बॉर्डर रोड ऑर्गेनायजेशन (BRO) चे आधिकारी आणि तीन टन सामान पाठवले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.