आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअफगाणिस्तानच्या इस्लामिक स्टेट खोरासानने (IS-K) भारतावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. ही धमकी (IS-K) ने त्यांच्या अलआझम फाउंडेशनवर एक बातमी बुलेटिन जारी करत दिली. IS-K ने दोन बुलेटिन जारी केले. यात पहिल्या बुलेटिनमध्ये भारताला धमकीचा संदेश देण्यात आला होता.
एका बुलेटिनमध्ये भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा व्हिडिओ दाखवण्यात आला. गेल्या आठवड्यात देशातील विविध शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर हिंसाचार उफाळला होता. तसेच देशात गेल्या काही दंगलींमध्ये सामील असलेल्या लोकांच्या घरांवर बुलडोझर चालवतानाही दाखवण्यात आले. व्हिडिओमध्ये IS-K मध्ये सहभागी असलेल्या भारतीय सैनिकांची प्रक्षोभक विधानेही आहेत.
IS-K च्या व्हिडिओमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख आहे. अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक शिखांवर हल्ले करण्याची आणि भारतात मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्याची धमकी देण्यात आली.
अल कायदानेही धमकी दिली
गेल्या आठवड्यात अल कायदा या दहशतवादी संघटनेनेही भारतात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा संदेश दिला होता. अल कायदाने दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट करुन पैगंबरावरील कथित टिप्पणीचा बदला घेणार असल्याचे म्हटले होते.
या व्हिडिओमध्ये तालिबानचाही निषेध
आपल्या व्हिडिओमध्ये IS-K ने तालिबानचाही निषेध केला आहे. एका भारतीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्याबद्दल IS-K ने तालिबान राजवटीचे प्रभारी संरक्षण मंत्री मुल्ला याकुब यांचा निषेध केला. अफगाणिस्तानच्या कार्यवाहक परराष्ट्रमंत्र्यांची भारतीय अधिकाऱ्यांसोबत झालेली बैठकीलाही चुकीचे ठरवले.
काही दिवसांपूर्वी तालिबानी सुरक्षा दलाच्या कारवाईत IS-K कमांडर मारला गेला होता. त्याच्या एका साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. या कमांडरने मे महिन्यात अफगाणिस्तानातील काबुल आणि बाल्ख येथे झालेल्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली होती.
तालिबानी राजवटीच्या विरोधात IS-K
तालिबान आणि IS-K त्यांच्या वेगवेगळ्या विचारसरणीमुळे आधीच एकमेकांशी विरोधक आहेत. तालिबानच्या पाश्चिमात्य देशांबद्दलच्या मवाळ भूमिकेमुळे आयएस-के आणि अल-कायदासारख्या दहशतवादी संघटना तालिबान राजवटीवर नाराज आहेत. अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीसाठी IS-K हा धोका कायम आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.