आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेषितांवरील कथित वादग्रस्त वक्तव्याविरोधात शुक्रवारच्या नमाजानंतर हिंसाचार उसळला. देशातील उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. उत्तर प्रदेशातील 8 शहरांमध्ये प्रयागराज, मुरादाबाद, सहारनपूर, फिरोजाबाद, आंबेडकर नगर, हाथरस, अलीगढ, जालौनमध्ये हिंसा झाली.
बंगालमधील हावडा येथे सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. दुसरीकडे हिंसाचारानंतर रांचीमध्ये कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बाधित परिसर सील करण्यात आला असून सरकारने कोणालाही घराबाहेर न पडण्याची ताकीद दिली आहे.
शुक्रवारच्या नमाजनंतर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये काय घडले ते एकेक करून समजून घेऊया.
1. पश्चिम बंगाल : सलग दुसऱ्या दिवशी हिंसा सुरूच
शुक्रवारी सुरू झालेली दंगल शनिवारीही सुरूच होती. हावडा येथील पांचला बाजारात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परिस्थिती पाहता हावडा येथील उलुबेरिया उपविभागांतर्गत राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे स्थानकांभोवती 15 जूनपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे.
2. उत्तर प्रदेश: पोलिसांची तयारी अयशस्वी
कानपूरमध्ये 3 जून रोजी झालेल्या हिंसाचारानंतर अवघ्या 7 दिवसांनी यूपीच्या 8 जिल्ह्यांमध्ये गोंधळ झाला. शुक्रवारच्या नमाजानंतर जमाव रस्त्यावर उतरला. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे नमाजी संतापले होते. प्रयागराज, मुरादाबाद, सहारनपूर, फिरोजाबाद, आंबेडकर नगर, हाथरस, अलिगढ, जालौनमध्ये उपासक रस्त्यावर उतरले. दोन दिवस पोलीस-प्रशासन सतर्क होते, मात्र अखेरच्या क्षणी सर्व सुरक्षा व्यवस्थेची तयारी फोल ठरली.
सर्वाधिक गोंधळ प्रयागराजमध्ये झाला. येथे निमलष्करी दलाचे अनेक जवान जखमी झाले. तसेच देवबंदमध्ये अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा देण्यात आल्या. मात्र, कानपूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने सर्वकाही नियंत्रणात राहिले. शनिवारी दुपारपर्यंत सहारनपूरमध्ये 48, प्रयागराजमध्ये 68, हाथरसमध्ये 50, मुरादाबादमध्ये 25, फिरोजाबादमध्ये 8, आंबेडकरनगरमध्ये 28 जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण 227 जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
सहारनपूर हिंसाचाराशी निळ्या टोप्यांचे कनेक्शन
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचारामागे काही बाहेरच्या लोकांचा हात असू शकतो. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, शुक्रवारी जामा मशिदीबाहेर असे काही लोक दिसले, जे याआधी येथे कधीच दिसले नव्हते. या लोकांनी काळा कुर्ता-पायजमा आणि निळ्या टोप्या परिधान केल्या होत्या. मशिदीतून जमाव बाहेर येताच या लोकांनी कोल्ड्रिंक्समध्ये मद्य मिसळून प्यायले आणि प्रक्षोभक घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतरच हिंसाचार उसळला.
2. झारखंड : हिंसाचारात 2 ठार, 13 जखमी
रांचीच्या मेन रोडवर शुक्रवारच्या नमाजानंतर हिंसाचार झाला. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. समाजकंटकांनी दगडफेक केली. तोडफोड करण्यात आली. जाळपोळ झाली. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. तर 13 जण जखमी झाले.
हिंसाचारानंतर आता झारखंडमधील सर्व 24 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यातील पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रांचीमधील हिंसाचारग्रस्त भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुजाता चौक ते अल्बर्ट एक्का चौक या मेन रोडवर कलम 144 लागू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.