आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nupur Sharma Gets Relief From Supreme Court | Refusal To Consider Detention Plea, Told Petitioner Withdraw Plea | Marathi News

नुपूर शर्मांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा:अटकेच्या याचिकेवर विचार करण्यास नकार, याचिकाकर्त्याला सांगितले- याचिका परत घ्या

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी नुपूर शर्मांना अटक करण्याची मागणी करणारी याचिका मागे घेण्याची सूचना केली. मुख्य न्यायमूर्ती यूयू लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्याला सांगितले- अशी याचिका करणे खूप सोपे वाटते, परंतु त्याचे दूरगामी परिणाम आहेत. याचिका परत घ्यावी असे आम्हाला वाटते.

26 मार्च रोजी नुपूर शर्मांनी एका टेलिव्हिजन वाहिनीवर प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. यानंतर देशात मोठा वाद आणि हिंसाचार सुरू झाला होता. अनेक मुस्लिम देशांनीही त्यांचा निषेध नोंदवला होता, त्यानंतर भाजपने शर्मा यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर करत त्यांना पक्षातून निलंबित केले.

19 जुलै रोजीही अटकेवर बंदी घालण्यात आली होती
19 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांच्या अटकेला 10 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली होती. न्यायालयाने 8 राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली होती. न्यायालयाने राज्यांना निर्देश दिले होते की नुपूर शर्मावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये.

1 जुलै रोजी न्यायालयाने सांगितले - फक्त तुम्हीच जबाबदार आहात
याआधी 1 जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माला चांगलेच फटकारले होते. कोर्ट म्हणाले- 'तुमच्यामुळे देशातील परिस्थिती बिघडली आहे. तुम्ही उशिरा माफी मागितली, तीही या अटींसह की कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी ते विधान मागे घेत आहे. तुम्ही राष्ट्रीय वाहिनीवर येऊन संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे.

नुपूर शर्मा यांच्यावर भाजपने केली होती कारवाई
27 मे रोजी नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती, त्यानंतर त्यांच्या विधानाचा देशभरातून निषेध सुरू झाला होता. त्याचवेळी काही इस्लामिक देशांनीही आक्षेप घेतला. येथे भाजपने नुपूरच्या वक्तव्यापासून फारकत घेतली आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.

बातम्या आणखी आहेत...