आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्माचे पोस्टर सुरतच्या रस्त्यावर लावण्यात आले आहेत. शहरातील जिलानी पुलाच्या रस्त्यावरील नुपूर शर्मा यांचे पोस्टर लावण्यात आले असून, त्या पोस्टरवर चपलांच्या खुणा करण्यात आल्या आहेत. या पोस्टरद्वारे नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुलावर असे पोस्टर का आणि कोणी लावले, याचा खुलासा तूर्तास झालेला नाही.
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही चर्चेत पैगंबरांवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर भाजपने त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले. "आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो", असे भाजपने म्हटले आहे. यानंतर नुपूर शर्मा यांनी सोशल मीडियावर एक वक्तव्य जारी करून माफीही मागितली आहे.
वक्तव्यापासून भाजपने स्वतःला दूर ठेवले
नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यापासून भाजपने दूरच राहणे पंसत केले आहे. या प्रकरणी नुपूर शर्मा यांना भाजपने 5 जून रोजी पक्षातून निलंबित केले होते. निलंबनापूर्वी भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी एक पत्र जारी केले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, "भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्माचा विकास झाला आहे. कोणत्याही धर्माच्या व्यक्तीचा अपमान केल्याचा भाजप तीव्र शब्दात निषेध करतो. कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अपमान करणाऱ्या विचारसरणीच्या विरोधात पक्ष ठाम आहे. भाजप अशा कोणत्याही विचारसरणीचा प्रचार करत नाही." असे पत्रात भाजपने म्हटले होते.
विधान घेतले मागे
भाजपमधून निलंबित झाल्यानंतर नुपूर शर्मा यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे. त्या म्हणाल्या की, "टीव्ही डिबेटमध्ये माझ्या देवाविरुद्ध वादग्रस्त शब्द बोलले जात होते, जे मला सहन होत नव्हते. या रागात मी काहीतरी आक्षेपार्ह बोलले. मला कोणाला दुखवायचे नव्हते. मी माझे शब्द परत घेते", असे म्हणत नुपूर शर्मा यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे.
पैगंबरांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी ज्ञानवापीवरील चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचवेळी नुपूरने दिल्ली पोलिसांकडे बलात्कार आणि खुनाच्या धमक्यांची तक्रार दाखल केली आहे.
वक्तव्यावर आंतरराष्ट्रीय गदारोळ
नुपूर शर्माच्या वक्तव्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर गदारोळ पाहायला मिलत आहे. कुवेत, अफगाणिस्तानसह अनेक मुस्लिम देशांनी या विधानावर आक्षेप घेतला. त्याचवेळी मुस्लिम देशांची संघटना ओआयसीने एक निवेदन जारी करून भारतातील मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराचा उल्लेख केला आहे. मात्र, भारत सरकारने ओआयसीचे विधान फेटाळून लावले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.