आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nusrat Jahan Membership Cancellation | BJP MP Sanghamitra Maurya Letter To Lok Sabha Speaker Om Birla; News And Live Updates

नुसरत जहाँ यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी:भाजप खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिले पत्र; टीएमसीच्या खासदाराने लग्नाच्या मुद्यांवरुन मतदारांची फसवणूक केली - मौर्य

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निखिलवर खात्यातून पैसे काढल्याचा नुसरत यांनी केला होता आरोप

पश्चिम बंगालमधील बशीरहाट लोकसभा मतदार संघातील तृणमूल कॉंग्रेसचे (टीएमसी) खासदार नुसरत जहाँ यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या लग्नांचे प्रकरण थेट लोकसभेत पोहोचले आहे. भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना एक पत्र लिहित लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. खासदार मौर्य म्हणाल्या की, नुसरत जहाँ यांनी आपल्या मतदाराची फसवणूक केली असून संसदेची प्रतिष्ठाही कंलकित केली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी मौर्य यांनी केली.

पत्रात काय लिहिले आहे?
उत्तर प्रदेशच्या बदायूं लोकसभा मतदारसंघाच्या खासदार संघमित्रा मौर्य यांनी पत्रात लिहिले आहे की, 'नुसरत जहां यांनी लोकसभेच्या सदस्यपदाची शपथ घेताना नुसरत जहाँ रुही जैन असे आपले नाव लिहिले होते. लोकसभेच्या अधिकृत संकेतस्थळावरही तिच्या पतीचे नाव निखिल जैन आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावली असल्याचे मौर्य यांनी सांगितले. नुसरत जहाँ यांच्या वैयक्तिक आयुष्यात कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. परंतु, त्यांनी संसदेला दिलेली माहिती चुकीची असून त्याने आपल्या मतदारांची फसवणूक केली आहे.

निखिल आणि नुसरत यांचे लग्न तुर्की मॅरेज रेग्युलेशनच्या आधारे 19 जून 2019 रोजी तुर्कीमध्ये झाले. त्यामुळे नुसरत यांनी निखिलपासून घटस्फोटासाठी अर्ज करण्यास नकार दिला होता. कारण त्यांचे म्हणणे होते की, हा लग्नाचा कायदा तुर्की देशातील असून तो भारतात लागू होत नाही. त्यामुळे मी निखिलसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे नुसरत यांनी सांगितले होते.

निखिलवर खात्यातून पैसे काढल्याचा नुसरत यांनी केला होता आरोप
तृणमूल खासदार नुसरत जहाँ यांनी निखिलवर आपल्या खात्यातून पैसे काढल्याचा आरोप केले होते. निखिलने विभक्त झाल्यावरदेखील माझ्या खात्यातून चुकीच्या पद्धतीने पैसे काढले. मी हे प्रकरण बॅक अधिकारर्‍यांसमोर ठेवले असून लवकरच याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे नुसरत यांनी सांगितले.

निखिल यांनी हा आरोप फेटाळून लावले
नुसरत जहाँ यांनी केलेले आरोप पती निखिल जैन यांनी फेटाळून लावले असून हे आरोप निराधार असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, नुसरतसाठी मी बरेच काही केले असून तिने नेहमीच लग्न नोंदणी करण्यास नकार दिला होता. माझ्यावर करण्यात येणारे आरोप खोटे असल्याचे निखिल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...