आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Odisha Jharkhand Cities Open For Examinees; Admit Card In Jharkhand Is A License, Free Transportation Facility In Odisha

जेईई-नीट परीक्षा:परीक्षार्थींसाठी ओडिशा-झारखंडची शहरे खुली; झारखंडमध्ये प्रवेशपत्र हा परवाना, ओडिशात मोफत वाहतूक सुविधा

नवी दिल्ली/ रांची/भुवनेश्वर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन विद्यार्थ्यांचे सरन्यायाधीश बोबडे यांना पत्र, परीक्षा स्थगितीची मागणी

देशभरात जेईई-नीट परीक्षा ठरलेल्या वेळीच होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रापर्यंत जाण्या-येण्यासाठी आणि त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी झारखंड आणि ओडिशाने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

जेईई मेन्स १ ते ६ सप्टेंबरदरम्यान आणि नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी घेण्यात येत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शुक्रवारी रात्री उशिरा परीक्षांच्या पार्श्वभूमीवर अनलॉक ४ ची घोषणा केली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा देता येईल. त्यांचे प्रवेशपत्रच त्यांचा येण्या-जाण्याचा परवाना असेल. स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेण्याची गरज नसणार. जेईई-नीट परीक्षेसाठी दुसऱ्या राज्यांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना १४ दिवसांच्या आवश्यक क्वॉरंटाइन कालावधीत सूट देण्यात आली आहे. तसेच ओडिशा सरकारने म्हटले आहे की, परीक्षा होणाऱ्या ७ शहरांत कोणतेही शटडाऊन नसणार. एवढेच नव्हे, तर परीक्षार्थींना विनाशुल्क वाहतूक सुविधा आणि राहण्याची व्यवस्थाही सरकार करेल.

दोन विद्यार्थ्यांचे सरन्यायाधीश बोबडे यांना पत्र, परीक्षा स्थगितीची मागणी

दोन विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे जेईई मेन्स आणि नीट परीक्षा मानवतेच्या आधारावर स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्याकडे केली आहे. विधी शाखेचा एक विद्यार्थी आणि बारावीच्या विद्यार्थ्याने संयुक्तरीत्या सरन्यायाधीशांना पत्राद्वारे याचिका पाठवली आहे.

0