आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय तपास संस्था अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल 27 विवाह करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केल्याचा खुलासा केला आहे. हा ओडिशाचा सर्वात मोठा गुन्हेगार असल्याचे वर्णन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश स्वेन असे या व्यक्तीचे नाव असून त्याने आतापर्यंत 10 राज्यांतील 27 हून अधिक महिलांशी लग्न केले आहे. लग्नानंतर महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या माणसाचे काळे कारनामे समोर आल्यानंतर सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्याने लग्न केलेल्या महिलांमध्ये डॉक्टर, सीए आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील यांचा समावेश होता.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वेनला बिभू प्रकाश स्वेन या नावानेही ओळखले जाते. ओडिशातील या ठकसेनावर 2011 मध्ये हैदराबादमधील लोकांनी 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आणि त्यांच्या मुलांना एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी जागा देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. 2006 मध्ये केरळमधील 13 बँकांची 1 कोटी रुपयांची फसवणूक आणि बनावट क्रेडिट कार्ड बनवल्याचा गंभीर आरोपही त्याच्यावर आहे.
ED करतेय फसवणुकीचा तपास
याप्रकरणी ओडिशाच्या पोलिसांनी स्वेनची पत्नी डॉ. कमला सेठी, तिची सावत्र बहीण आणि ड्रायव्हर यांनाही अटक केली होती. त्यानंतर या सर्वांना ओडिशा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संशयिताकडून जप्त केलेल्या कागदपत्रांपर्यंत पोहोचण्यासाठी एजन्सी राज्य पोलिसांच्या संपर्कात आहे.
या 66 वर्षीय ठकसेनाने आतापर्यंत किती गुन्हे केले आहेत हे तपासातून समोर येईल, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, स्वेनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाईल आणि एजन्सी त्याच्या चौकशीसाठी रिमांडची मागणी करणार आहे.
दिल्लीच्या पत्नीने दिली होती तक्रार
अहवालानुसार, ओडिशा पोलिसांचे एक पथक 8 महिन्यांपासून स्वेनच्या कृष्णकृत्यांचा माग घेत होते, पोलिसांनी त्याला 13 फेब्रुवारी रोजी अटक केली. पोलिसांनी सांगितले की, मे 2021 मध्ये दिल्लीत राहणाऱ्या स्वेनच्या पत्नीने फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. महिलेने सांगितले की, तिने 2018 मध्ये स्वेनसोबत लग्न केले होते.
कशी करायचा महिलांची फसवणूक?
दिल्लीतील तपासाच्या आधारे पोलिसांनी सांगितले की, स्वेनने भुवनेश्वरमध्ये तीन अपार्टमेंट भाड्याने घेतले होते आणि तिन्ही अपार्टमेंटमध्ये त्याच्या तीन बायका ठेवल्या होत्या. स्वेनच्या पत्नींनी सांगितले की, तो बँक खाती गोठण्याच्या भीतीने त्याच्या इतर पत्नींकडून पैसे उधार घेत असे आणि नंतर नवीन पत्नी शोधत असे. या सगळ्यातून तो महिलांची फसवणूक करायचा.
या महिलांची केली फसवणूक
स्वेनने ज्या महिलांना फसवले आहे त्यात इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांतील सहायक कमांडंट, छत्तीसगडमधील चार्टर्ड अकाउंटंट, आसाममधील एक डॉक्टर, सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे दोन वकील आणि एक महिला आहे. केरळ प्रशासकीय सेवेतील अधिकारीही यात आहे. आता तो ईडीच्या तावडीत सापडला आहे. ईडीची टीम त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई केली जात आहे.
कोट्यवधींच्या घोटाळ्याची चौकशी होणार
MBBSच्या विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची, बँकांकडून कर्जे घेणे, लग्न करून फसवणूक करणे आणि 27 बायकांना फसवून लग्न या प्रकरणांची ईडी चौकशी करणार आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, केंद्रपाडा जिल्ह्यातील पाटकुरा भागातील रहिवासी रमेश चंद्र स्वेन याने स्वत:ला राज्यात आणि राज्याबाहेर डॉक्टर तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा प्रशासकीय अधिकारी असल्याचा दावा करून फसवणूक केली. त्याने अशाच थापा मारून 27 महिलांशी वेगवेगळ्या पद्धतीने लग्ने केली. आयुक्तालय पोलिसांच्या विशेष पथकाने राज्याची राजधानी भुवनेश्वर येथे बनावट डॉक्टर रमेशचंद्र स्वेन याला अटक करून पुढील तपास केला. या टीममध्ये महिला ठाणे, सायबर सेल आणि अँटी फ्री सेलचा समावेश होता. यानंतर घोटाळेबाज रमेश स्वेनबद्दल पोलिसांना ही सर्व माहिती मिळाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.