आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालकाच्या छळाने त्रस्त मजूर 1000 किमी पायी चालत घरी परतले:नोकरीसाठी ओडिशातून बंगळुरूला गेले होते; पगार मागितल्यावर मारहाण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरूत काम करणारे ओडिशातील तीन मजूर मालकाच्या छळाला कंटाळून तब्बल एक हजार किलोमीटर पायी चालत आपल्या घरी परतल्याची घटना समोर आली आहे. कतार मांझी, बुडू मांझी आणि भिकारी मांझी अशी या तिन्ही मजुरांची नावे असून ते ओडिशातून बंगळुरूत नोकरीसाठी गेले होते. तिथे कंपनीने त्यांना पगार दिला नाही. पगार मागितल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली.

26 मार्चपासून पायी प्रवासाला सुरूवात

हे तिघेही ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातून त्यांच्या घरी परतत होते. तेव्हा काही स्थानिक लोकांनी त्यांना बघितले आणि त्यांची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, ते तिघेही 26 मार्चपासून पायी चालत आहेत. त्यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. त्यात त्यांच्या हातात सामान आणि पाण्याची बाटली दिसत आहे.

मजुरांनी सांगितले की 26 मार्चला त्यांनी प्रवासाला सुरूवात केली. त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते.
मजुरांनी सांगितले की 26 मार्चला त्यांनी प्रवासाला सुरूवात केली. त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते.

12 जण नोकरीसाठी बंगळुरूला गेले होते

हे तिन्ही मजूर आणखी 9 जणांसह दोन महिन्यांपूर्वी बंगळुरूला गेले होते. तिथे एका कंपनीत त्यांना काम मिळाले होते. मात्र त्यांच्या मालकाने त्यांना मजुरी द्यायला नकार दिला होता. या मजुरांनी पैसे मागितल्यावर त्यांचा छळ करण्यात आला आणि मारहाणही करण्यात आली.

छळ सहन न झाल्याने परतले

त्यांनी सांगितले की, आम्ही आमच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी आणि पैसे कमावण्याच्या आशेने बंगळुरूला गेलो होतो. पण तिथे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला पगार द्यायला नकार दिला. आम्हाला त्यांचा छळ सहन झाला नाही म्हणून आम्ही परत आलो.

तथापि, त्यांची परिस्थिती बघून रत्यातील एका दुकानदाराने त्यांना जेवण दिले. तर ओडिशा मोटरिस्टस असोसिएशनच्या पोट्टांगी शाखेच्या अध्यक्षांनी त्यांना 1500 रुपये दिले आणि घरी जाण्याची व्यवस्थाही करून दिली.

ही बातमीही वाचा...

चेन्नईत महिलेने केली प्रियकराची हत्या:बहाण्याने बोलावले, मित्रांसह मिळून केला खून; मृतदेहाचे तुकडे करून 400 किमी अंतरावर पुरले