आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Odisha Russian Death Mytery Update; Paradip Port Cargo Ship | Police Said Death Heart Attack

ओडिशात 15 दिवसांत तिसऱ्या रशियन व्यक्तीचा मृत्यू:पारादीप बंदराच्या मालवाहू जहाजात मृतदेह आढळला

भुवनेश्वरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

10 दिवसांपूर्वी ओडिशाच्या रायगड हॉटेलमध्ये व्लादिमीर पुतिन-आलोचक पॉवेल अँटोव्ह आणि त्याचा मित्र व्लादिमीर ब्यदानोव यांच्या गूढ मृत्यूनंतर आणखी एका रशियन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी जगतसिंगपूर येथील पारादीप बंदरात मालवाहू जहाजावर हा व्यक्ती मृत आढळून आला.

ओडिशा पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख 51 वर्षीय सेर्गेई मिलियाकोव्ह अशी केली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सेर्गेई कार्गोचा क्रू मेंबर
वृत्तानुसार, पोलिसांनी तपासाअंती सांगितले की, मृत व्यक्ती मालवाहू जहाजाच्या क्रू मेंबर्सपैकी एक होता. शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समजेल. जगतसिंगपूरचे एसपी अखिलेश्वर सिंह यांनी सांगितले की, सर्गेई अचानक जहाजावर पडले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा.

बंदरातून पारादीप मार्गे मुंबईकडे निघाले होते. पहाटे 4.30 च्या सुमारास सर्गेई जहाजाच्या चेंबरमध्ये मृतावस्थेत आढळले.

हे छायाचित्र व्लादिमीरचे आहे, जो त्याच्या हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत सापडला होता.
हे छायाचित्र व्लादिमीरचे आहे, जो त्याच्या हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत सापडला होता.

पुतीन यांच्या विरोधक खासदाराचा गूढ मृत्यू:पुतीन यांच्यावर टीका, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

ओडिशाच्या रायगढा येथील एका हॉटेलमध्ये उतरलेल्या रशियाच्या दोन पर्यटकांचा गूढ स्थितीत मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक रशियन खासदार पॉवेल अँटोव्ह (६५) आहेत. युक्रेन युद्धावरून त्यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली होती. संपूर्ण बातमी येथे वाचा...

बातम्या आणखी आहेत...