आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इच्छाशक्ती:जेथे नेटवर्क, तेथेच बँक; लाॅकडाऊनमध्ये 7 हजार लोकांपर्यंत असा पोहोचवला पैसा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो स्टोरी- संदीप राजवाडे

हे छायाचित्र ओडिशातील कोरापुट जिल्ह्यातील सलोमी शंकरचे आहे. ती स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) किआॅस्क चालवते, जी कमिशन आधारित खासगी ग्राहक सेवा देते. मात्र, सलोमी इतर किऑस्क चालवणाऱ्यांपेक्षा वेगळी आहे. ती दुचाकीवरून ग्राहकांपर्यंत स्वत: जाते. संसर्गाच्या काळात तिने गेल्या पाच महिन्यांत ७ हजारांपेक्षा जास्त लोकांपर्यंत स्वत: जात पैसे पोहोचवले. येथील टोयापूर गावात राहणारी २७ वर्षीय सलोमी सकाळी आठ वाजता उठून घरातून निघते आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत जवळपासच्या ९ गावांमध्ये सेवा पुरवते. या गावांमध्ये इंटरनेटची अडचण आहे. यामुळे रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर जेथे नेटवर्क येते तेथे बसून कामाला सुरुवात करते.

उसनवारी करून घेतला लॅपटॉप
गेल्या वर्षीच सलोमी एसबीआयमध्ये आली. तिचे वडील मजूर आहेत. वडील रमेश शंकर यांनी सांगितले, लॉकडाऊनमध्ये गावोगावी बँक सेवा पुरवण्यासाठी तिच्याकडे लॅपटॉप नव्हता, संगणक घेऊन जाऊ शकत नव्हती. यामुळे सलोमीने मित्रांकडून उसनवारी करून ३५ हजार रुपयांचा लॅपटॉप घेतला.