आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Odisha Tribal Leader Draupadi Murm Is The NDA's Presidential Candidate; Decision Of 15 Parties |marathi News

घोषणा:ओडिशाच्या आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्म एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार; 15 पक्षांचा निर्णय

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा(एनडीए) उमेदवार म्हणून ओडिशातील आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू(६४) यांच्या नावाची घोषणा केली आहे. तत्पूर्वी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ही घोषणा केली. मुर्मू यांनी झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारीही यापूर्वी सांभाळली आहे.

इकडे... शरद पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सिन्हांचे नाव जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत विरोधकांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या नावावर एकमत झाले. या बैठकीत वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांच्या नावावर मतैक्य झाले. बैठकीस सिन्हा उपस्थित होते. त्याआधी सिन्हा यांनी सकाळी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. याआधी शरद पवार, फारुक अब्दुल्ला यांचे नावही चर्चेत आले होते.

बातम्या आणखी आहेत...