आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चकमक:ओडिशातील कालाहांडी येथे झालेल्या चकमकीत 3 माओवादी ठार, एक पोलिस अधिकारी जखमी; घटनास्थळावरून शस्त्रेही जप्त

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओडिशातील कालाहांडी येथे मंगळवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले आहेत. त्याचवेळी एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. तप्रेंगा-लुबांगड जंगलात पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. घटनास्थळावरून शस्त्रेही जप्त करण्यात आली असून जखमी पोलिस कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या बाबत माहिती देतांना डीजीपी म्हणाले की, ‘आजूबाजूच्या जंगल भागात शोधमोहीम अजूनही सुरू आहे.’

ओडिशातील कालाहांडी जिल्ह्यातील एम.रामपूर पोलिस स्टेशन अंतर्गत टापरेंग-लुदेनगढ राखीव जंगलाजवळ झालेल्या चकमकीत पोलिस उपअधीक्षक (SDP) यांनाही गोळ्या लागल्या आहेत.

माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिस कर्मचारी परिसरात शोध मोहीम राबवत असताना माओवादी दिसले. त्याच वेळी त्यांच्या वतीने हल्ला करण्यात आल्यानंतर, पोलिसांच्या पथकाने प्रत्युत्तर दिले आणि भीषण चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले.

पोलिस अधिकाऱ्याच्या पायाला लागली गोळी

या भागात पुन्हा एकत्र येण्याच्या त्यांच्या रणनीतीचा भाग म्हणून आठवडाभर चाललेल्या माओवाद्यांच्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू करण्यात आली. सूत्रांनी सांगितले की, पोलिस अधिकाऱ्याच्या पायात गोळी लागल्याने त्यांना उपचारासाठी बालंगीर येथील भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

चकमकीनंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि घटनास्थळावरून तीन रेड बंडखोरांचे मृतदेह सापडले आहेत. यात एक AK-47 असॉल्ट रायफल देखील जप्त करण्यात आली आहे, तर परिसरात आणखी माओवाद्यांची उपस्थिती शोधण्यासाठी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

माओवाद्यांच्या हल्ल्यानंतर कारवाई

छत्तीसगडच्या दंतेवाडा भागात नुकत्याच झालेल्या माओवाद्यांच्या हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये 26 एप्रिल रोजी 10 जिल्हा राखीव रक्षक (DRG) कर्मचारी आणि एक नागरी चालक ठार झाला होता.

छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्यानंतर ओडिशा पोलिसांनी राज्याच्या सीमावर्ती भागात अलर्ट जारी केला होता. खबरदारीचा उपाय म्हणून ओडिशातील नबरंगपूर, मलकानगिरी, नुआपाडा, बारगढ आणि कालाहांडी जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.